जावळीजिह्वाराज्य

बोंडारवाडी विभागात दरड प्रवन क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी : जावलीतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासना कडून सूचना


मेढा प्रतिनिधी / सुनिल धनावडे

दि.२० :-मागील दोन वर्षांपूर्वी बोंडारवाडी विभागात पावसामुळे, अतिवृष्टीने खुप मोठी हाणी झाली होती अतिवृष्टीमुळे केळघर विभागातील भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडी या गावांना अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. दरडी,कडे कोसळल्या होत्या. पुल वाहुन गेले होते नदीपात्रात असलेल्या शेतजमिनीत मोठ्यामोठ्या दगडी आल्या होत्या. नद्या,ओढ्यांनी प्रवाह बदलल्याने शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले होते. नदी आहे कि आपली शेती हेच शेतकर्यांना समजत नव्हते शेती वाहून गेल्याने या तीनही गावांतील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्ननिर्माण झाल्याने या तीनही गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या गावांतील ग्रामस्थांनी केली होती.


सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनूसार दि. 20जुलै रोजी सातारा जिल्ह्याला अतिवृष्टी चा ( ऑरेज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे.या बाबींचा विचार करता आज जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन संपर्क प्रमुख उपजिल्हाधिकारी भूसंपादन सतिश धुमाळ साहेब उपविभागीय अधिकारी जावली श्री.दादासाहेब दराडे,तहसिलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी दरड प्रवान गावे भुतेघर,वाहिटे, बोंडारवाडी या गावांची पाहणी केली.गेल्या दोन वर्षा पूर्वी जावळी तालुक्याच्या पश्चिम विभागातील या तीन गावांत डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणावरअतिवृष्टी झाली होती.याची संपूर्ण माहिती सरपंच व गावातील लोकांकडून घेऊन दरड प्रवन क्षेत्र प्रत्यक्ष पाहणी करून येथील नागरिकांना सतर्क राहणे बाबत सूचना दिल्या

नागरिकांना तात्पुरत्या स्थलांतरण साठी काही ठिकाणे प्रत्यक्ष पाहणी करून स्थलांतर करण्याबाबची माहिती घेऊन संभाव्य धोक्याची ठिकाणी असलेल्या कुटुंबांना अतिवृष्टी कालावधीत स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या.
या वेळी मंडल अधिकारी उमेश डोईफोडे,तलाठी संदीप ढाकणे,तलाठी सुरज माळी,ग्रामसेवक रविकांत सपकाळ ग्रामसेवक सुधीर पोतदार भुतेघरचे सरपंच अंकुश मानकुबंरे, बोंडारवाडी सरपंच सुनिता मानकुंबरे,विष्णू मानकुबंरे,वाहिटेचे राजाराम जांभळे, बोंडारवाडी, भुतेघर, वाहिटे,गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button