कुडाळ ता.२०- जावली तालुक्यात विकासात्मक जाळे विणणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून जावळी तालुक्यातील विविध तलाठी कार्यालय बांधकाम करणे या कामांसाठी ९० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार जुलै २०२३ च्या अर्थसंकल्पात या कामांचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्याच्या भौोगोलिकदृष्ट्या विचार करून विविध ठिकाणी अंदाजे ६ तलाठी कार्यालय उभारण्यात येणार असून,त्यानुसार तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी ९० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया व इतर सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून सदर कामे वेळेत पूर्ण करा आणि कामे दर्जेदार करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.