कुडाळ ता. 14 – जावळी तालुक्याचे भाग्यविधाते व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय राजेंद्र लालसिंगराव शिंदे (भैय्यासाहेब) यांच्या 17 व्या पुण्यतिथी निमित्त रविवार ता. 16 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सोनगाव ता. जावळी येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर 1001 वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांनी दिली आहे.
सातारा जिल्हाच्या सहकार चळवळीत स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांचे महत्वपूर्ण योगदान होते, जावळी तालुक्यातल्या दुर्गम डोंगराळ भागांमध्ये शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व भवितव्यासाठी प्रतापगड सहकारी साखर कारखानाची उभारणी त्यांनी केली होती, तसेच जावली तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, कै.लालसिंगराव शिंदे सहकारी पतसंस्था आदी सहकार क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान होते, त्यांच्या 17 व्या पुण्यतिथी निमित्त सोनगाव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी जावळी तालुक्यातील मानयवरांच्या उपस्थितीत कारखाना परिसरात 1001 वृक्षांची लागवड करण्यात येमार असून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात कै.लालसिंगराव शिंदे सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून प्रतापगड कारखान्याचे कर्मचारी यांना पगार वाटप, तसेच
पुण्यतिथी निमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन व आदरांजली वाहण्यात येणार आहे, यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित रहणार आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे