कुडाळ ता. 13 – सरताळे ता.जावळी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दस्तगीर भाई शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या मुख्य कार्यालयात पदाधिकारी निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती, यावेळी अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी जाहीर केले.
सरताळे विकास सेवा सोसायटीची गतवर्षीच निवडणूक पार पडली होती. यामध्ये सर्वप्रथम सौ. राजश्री नवले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. यावेळी गावपातळीवर झालेल्या निर्णयानुसार त्यांनी आपला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सोसायटीच्या रिक्त पदासाठी सर्व संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. यामध्ये अध्यक्ष पदासाठी दस्तगीर भाई शेख यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी लक्ष्मण पवार, उपाध्यक्ष सुनिल भिसे, सरपंच, उपसरपंच, माजी अध्यक्षा राजश्री नवले, संचालक राजेंद्र पवार, ईनुस शेख, प्रकाश जाधव, दिनेश गायकवाड, विशाल जाधव, सचिन नवले, तंटामुक्त अध्यक्ष पिंटू भिसे, मोहन नवले, मोहन काळे, मारूती चव्हाण, श्रीमती बेबी नवले, संजय नवले, अभिजित शेडगे, सोमनाथ पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सचिव मनोज देशमाने यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले. या निवडीबद्दल अध्यक्ष दस्तगीर भाई शेख यांचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांनी अभिनंदन केले.