कुडाळ प्रतिनिधी . 28 – विठ्ठल नामाची शाळा भरली..वृक्षवल्ली आम्हा सोयरे..विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठ्ल अशा अभंगात दंग झालेल्या वारकऱ्यांनी टाळमृदुंगाच्या जयघोषात चिमुरडा विठोबा व रुक्मिणी तसेच नऊवारी साडी परिधान केलेल्या मुली, पांढरे शुभ्र धोतर, शर्ट व टोपी अशा वेशात भगव्या पताका व झाडे लावा झाडे जगवा, बाबत सामाजिक संदेश देणारे फलक हाती घेतलेले बाल वारकरी मुले, टाळ-मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत प्रतिपंढरपूर करहर नगरीत पाचवड येथील आपुलकी मतिमंद शाळेतील अपंग व मतिमंद (विशेष) विद्याथ्यार्नी आषाढी एकादषीच्या पुर्वसंध्येला दिंडी काढून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या करहर ता. जावळी येथे हजारो भाविक आषाढीला येतात, पाचवड येथील आपुलकी मतिमंद मुलांच्या शाळेतील विध्यार्थी ही प्रत्येक आषाढीला करहर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात, या बालवारकर्यांनी आपल्या शाळेची परंपरा कायम ठेवत पाचवड -कुडाळ ते करहर अशी आषाढीच्या पुर्वसंध्येला विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा धारण करून टाळ, मृदंग, लेझिमच्या गजरात गावातून दिंडी काढली.
तसेच या दिंडीमध्ये वृक्षदिंडीचेही आयोजन करून झाडे लावा झाडे जगवा, झाडांना घाला पाणी ते वाढवतील पाऊस पाणी, वृक्षतोड करू नका..जिवन धोक्यात घालू नका, पर्यावरणाची रक्षा मह्णजे जगाची सुरक्षा अशी जनजागृती करण्यासाठी विद्याथ्यांनी सामाजिक संदेश देणारे फलकही हातात घेतले होते या दिंडीने गावात भक्तिमय वातावरण तयार झाले .यावेळी दिंडीत 50 हून अधिक (विशेष) विध्यार्थींनी सहभाग घेतला संस्थेच्या संस्थापिका सैा. सुषमा पवार यांनी यावेळी विद्यार्थांना संतांचे महात्म्य सांगितले. मुख्याध्यापिका श्रीमती नलिनी गायकवाड यांनी दिंडीचे सुयोग्य नियोजन केले. यावेळी मनसोपचार तज्ञ, सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते, करहर ग्रामस्थांच्या वतीने मुलांना खाऊवाटपही करण्यात आला.तसेच माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे यांनी या दिंडीचे स्वागत करून विशेष मुलांच्या दिंडाचे काैतुक करून शाळेस सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.