मेढा प्रतिनिधी
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य ,उपप्राचार्य ,प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमात योगा विषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करण्यासाठी योग अंबिका कुटीर संस्था ठाणे शाखा सातारा येथून योगशिक्षक श्री विठ्ठल अभंग सर व योगशिक्षक श्री उमेश राऊत सर यांनी प्रोटोकॉल प्रमाणे योगाचे योग्य प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक करून दाखवली व करून घेतली .या कार्यक्रमास सर्वांनीच अतिशय उत्कृष्टपणे सहभाग नोंदवला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी भणंग तसेच सर्व शाळामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मामुर्डी येथे मुख्याध्यापक सुरेश धनावडे धोंडीबा मोरे , शेलार गुरुजी भणंग येथे केंद्रप्रमुख संपत धनावडे, मुख्याध्यापक डी.टी.धनावडे, अशोक लकडे,शंकर ओंबळे, आणि विद्यार्थी यांनी विविध प्रकारची योगासने प्राणायाम आणि ध्यान धारणा केल्या तसेच मेढा नगरपंचायत येथे डॉ अपर्णा कुलकर्णी या प्रशिक्षक म्हणून लाभल्या होत्या.
यावेळी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,नगरपंचायत अधिकारी,प्रशासकिय अधिकारी वर्ग उपस्थित होते. नगरपंचायत मध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपा नगरसेवक श्री विकास देशपांडे यांनी केले होते.