कै.प्रतापराव भाऊ परामणे यांचे आचाराने, विचाराने चालणारे नेतृत्व होते, या तालुक्याला अनेक दिग्गज नेत्यांचे नेतृत्व लाभले, त्यामध्ये माजी आमदार लालसिंगराव शिंदे, भि.दा.भिलारे गुरूजी, जी.जी.कदम. राजेंद्र शिंदे यांच्या सोबत प्रतापराव भाऊ परामणे यांनी तालुक्यात विचाराने राजकारण केले, म्हणूनच आजही त्यांची आठवण मोठ्या सन्मानाने आपण काढत आहोत, स्वर्गीय भाउसाहेब महारांजांसोबत प्रतापराव भाऊंचे घनिष्ट संबंध होते, म्हणूनच त्यांना सातारा बाजार समितीवरही काम करण्याची संधी मिळाली होती, त्यावेळचे राजाकारण वितारांचे, निष्ठेचे होते, आत्ताचे स्वरूप वेगळ्या पध्दतीने जात आहे, माझ्या सोहत काम करणार्या सर्वांची तालुक्याच्या विकासासाठी धडपड करत आहेत ,विकासकामे झाली पाहीजेत यासाठी सर्वजन काम करत आहेत, संदिप परामणे यांना काही राजकीय ठिकाणी थांबावे लागले, मात्र कधी कधी लांब झेप घ्यायला कधी कधी दोन पाऊले माघे यावे लागते, राजकारणात प्रत्येकाला संधी देताना मर्यादा पडतात मात्र जो समाजात सातत्याने कार्यरत आहे, त्याला संधी नक्की मिळते, संदिप परामणे यांच्या सोबत मी कायम आहे व यापुढेही राहणार आहे, योगय् वेळी योग्य संधी देणार असल्याचे अभिवचनही यावेळी आमदार भोसले यांनी दिले.
कुडाळ ता.जावळी येथे कै.प्रतापराव भाऊ परामणे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे अनावर सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते, यावेळी कार्यक्रमास प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे, जावळी बाजार समितीचे सभापती जयदिप शिंदे, माजी उपसभापती मालोजीराव शिंदे, डाँ.परामणे, हिंदुराव तरडे, रविंद्र परामणे, प्रकाश परामणे, तानाजीराव शिर्के, अजय शिर्के, श्रीहरी गोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरूवातीस आमदार भोसले, सैारभबाबा शिंदे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून प्रतिमेचे अनावरण करण्यात आले, प्रकाश परामणे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले तर रविंद्र परामणे यानी सर्वांचे आभार मानले.