जावळीजिह्वासामाजिक

प्रतिपंढरपूरचा आषाढी सोहळा यशस्वीरित्या पार पाडावा – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले- करहर येथे आषाढी यात्रा नियोजनाबाबत ग्रामस्थ व प्रशासनाची बैठक


कुडाळ ता. 18 – प्रतिपंढरपूर करहर ता. जावळी येथील आषाढी यात्रा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना सूरू केल्या आहेत. यात्रेशी संबंधित विभागांनी त्यांच्याकडे सोपवलेल्या कामांचे योग्य नियोजन करून ही कामे प्राधान्याने मुदतीत पूर्ण करावीत, प्रतिपंढरीची प्रचिती संपुर्ण जिल्हायात वाढल्याने मोठ्या संख्येने भाविक प्रती पंढरपूर करहर मध्ये विठ्ठल दर्शनास येत आहेत त्या पार्श्भूमीवर शासनाच्या प्रत्येक विभागाने योग्य त्या दक्षता घेवून उत्सव सोहळा चांगल्या पद्धतीने कसा पार पडेल या दृष्टीने व्यवस्था ठेवावी. भाविक व ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे प्रशासनास सहकार्य करून यात्रा सोहळा अधिकाधिक दिमाखदार व यशस्वीरित्या पार पाडावा असे आवाहन सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बोलताना केले.

प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढी यात्रा नियोजनाबाबत आयोजित केलेल्या बैठकीवेळी ते बोलतहोते. यावेळी विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या.या बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे, बाजार समितीचे सभापती जयदिप शिंदे, माजी उपसभापती हणमंतराव जाधव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे, तहसीलदार शोभा भालेकर, गटविकास अधिकारी अरुणमारबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी खराडे, वारकरी संप्रदायाचे तालुका अध्यक्ष बापूराव गोळे,तुकाराम घाडगे, रांजणे गुरुजी, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, शिवाजीराव मर्ढेकर, नितीन गावडे, करहरचे सरपंच सोनाली यादव, उपसरपंच प्रवीण झेंडे, अनिल विभुते,किरण भिलारे, ग्रामपंचायत सदस्य, विभागातील विविध गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ तसेच सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व उत्सव समिती व सांप्रदायिक मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
दिंडींचे नियोजन सालाबादप्रमाणे संबंधित वारकरी संस्था व करहर ग्रामस्त करणार आहेत.

सकाळी १० वा. विभागातील शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे चित्ररथ व दिंड्या निघतील तसेच पंचायत समितीच्या वतीने सर्व शासकिय विभागांचे विविध चित्ररथ काढण्यात येतील सकाळी ११ ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत परिसरातील विविध भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम त्यानंतर जिल्हयातून आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार कार्यक्रम होईल. तसेच यासोहळ्यासाठी पार्किंग व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून सर्व एस टी बस ह्या आंबेघर पर्यंतच जातील तिथून पुढील रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येईल, विज वितरण विभागाने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या अनावश्यक फांद्या काढून तिरके झालेले लाईटचे खांब सरळ करून घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या,

यावेळी भाविकांना रांगेतून दर्शऩ घेण्यासाठी मंडपाची उभारणी करावी तसेच दिंडी सोहळ्यासाठी आरोग्य व शिक्षण विभागाने सामाजिक संदेशपर चित्ररथ काढून मिरवणुक काढावी अशा सुचना दिल्या, भाविकांसाठी आरोग्यसेवा, स्वच्छता याबाबत सविस्तर चर्चा झाली. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे तसेच पावसामुळे चिखल होत असल्याने करहर पाचगणी या रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्यांवर मुरूम टाकणे आदी निर्णय घेण्यात आले. करहर येथे येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले. बैठकीमध्ये ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती, आदी विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. नितिन गावडे यांनी उपस्थिांचे स्वागत केले. तर यात्रा समीतीच्या वतीने आभार मानन्यात आले. बैठकीनंतर मान्यवरांनी मंदिर तसेच सभामंडप, दर्शन रांगपरिसराची पाहणीही केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button