कुडाळ ता. १५- जावळी तालुकयातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या कै. लालसिंगराव बापूसाहेब शिंदे सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ.अंकिता सौरभ शिंदे (कुडाळ) यांची व उपाध्यक्षपदी श्री. रमेश दत्तात्रय फरांदे (आनेवाडी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कुडाळ ता.जावळी येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात पदाधिकारी निवडी साठी संचालक मंडळाची विशेष बैठक बोलवण्यात आली होती, त्यावेळी अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल करण्यात आले होते,त्यामुळे सर्वानुमते अध्यक्षपदी सौ.अंकिता सौरभ शिंदे यांची व उपाध्यक्षपदी श्री. रमेश दत्तात्रय फरांदे यांची
बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी घोषित केले. सदरच्या निवडी नंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जावली तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या कुडाळ येथील कै. लालसिंगराव बापूसो शिंदे सहकारी पतसंस्थेचा सन 2023-24 ते 2028-29 या पाच वर्षासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. या निवडणुकीत संचालक मंडळाच्या तेरा जागांसाठी तेराच अर्ज दाखल झाले होते,त्यामुळे प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ बाबा शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली होती,त्यानंतर आज पदाधिकारी निवडी ही बिनविरोध झाल्या. बिनविरोध निवड झालेले संचालक पुढील प्रमाणे सर्वसाधारण मतदारसंघ सौरभ राजेंद्र शिंदे (कुडाळ), रमेश दत्तात्रय फरांदे (आनेवाडी) , श्रीरंग पंडित (खर्शी बारामुरे), रघुनाथ जगन्नाथ तरडे (बामणोली), कांताराम आण्णा ससाणे (आर्डे ), नितीन बबन दुदुस्कर (मोरेवाडी ), रवींद्र प्रल्हाद निकम (करंदी तर्फ कुडाळ ), विकास ज्ञानेश्वर जाधव (कुडाळ ), महिला राखीव मतदार संघातून सौ. अंकिता सौरभ शिंदे व सौ.लीलावती दिलीप पवार ,जितेंद्र साहेबराव खरात (मोरावळे) अनुसूचित जाती जमाती, राहुल विठ्ठल बावकर (कुडाळ ) विमुक्त जाती जमाती, अशोक तात्याबा रासकर (कुडाळ) इतर मागास प्रवर्ग आदी सर्व संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यालयात नवीन संचालक मंडळाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुक्यातील विवध मान्यवर यांच्यासह ग्रामस्थ, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक साबळे यांनी सर्वांचे स्वागत केले तर उपव्यवस्थापक शिवणकर यांनी सर्वांचे आभार मानले
- सैा. अंकिता सैारभ शिंदे
अध्यक्षा, कै, लालसिंगराव शिंदे सह.पतसंस्था
जावळीचे सहकारमहर्षी कै.लालसिंगराव शिंदे व कै. राजेंद्र शिंदे यांनी स्थापन केलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या रोपट्याचे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे, त्यांच्या पाश्चात श्रीमती सुनेत्राताई शिंदे व श्री सैारभबाबा शिंदे यांनी या संस्था खऱ्या अर्थाने
टिकवल्या, किंबहूना त्या अधिक जोमाने वाढवून प्रगतीपथावर नेल्या आहेत, नुकत्याच बिनविरोध
झालेल्या कै. लालसिंगराव शिंदे सहकारी पतसंस्थेच्या नुतन संचालक मंडळात मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची नव्याने संधी मिळाली असून, शिंदे घराण्याचा राजकिय, सामाजिक वारसा पुढे नेहण्याची
जबाबदारीही यानिमित्ताने माझ्यावर पडली आहे, ही जबाबदारी सर्व संचालकांच्या सहकार्याने नक्कीच यशस्वीपणे पार पाडणार असून, संस्थेच्या आजपर्यंतचा व्यवहारामधील पारदर्शीपणा, आपुलकीची वागणूक
यामुळेच संस्थेने गेली 35 वर्षे ग्राहकांचा, ठेवीदारांचा मोठा विश्वास कमाविला आहे, तो अधिकाधिक वाढवण्याचा सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी नक्की प्रयत्न करतील.