जावळीसामाजिक

जावलीतील विश्वंभरबाबा पायी दिंडीचे रविवारी 11 जुलै ला आळंदीकडे प्रस्थान


मेढा प्रतिनिधी
वै गुरुवर्य भिकोबा महाराज देशमुख व स्व अनुसया आत्या देशमुख यांनी सुरु केलेली २८ वर्षापासुनची विश्वंभरबाबा आषाढी पायी दिंडी सोहळा जावळी मेढा विभाग जिल्हा.सातारा.दिंडी क्र. १६७ माऊली रथा मागे.वै.ह.भ.प गुरूवर्य भिकोबा महाराज देशमुख यांच्या कृपाशीर्वादाने तसेच प्रेरणेने व सर्व विश्वंभरबाबा पायी दिंडी सोहळा संचालक, विश्वंभरबाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, यांच्या कुशल नेतृत्वाखाली त्याचबरोबर तालुक्यातील सर्व वारकरी,अन्नदाते, देणगीदार, कलाकार स्वयंसेवक, यांच्या अनमोल सहकार्यातून गेले 28 वर्षांपासून हा दिंडी सोहळा चालू असून या ही वर्षी हा दिंडी सोहळा जावळीची राजधानी मेढा नगरीतून रविवार दि.11/06/2023 या दिवशी आळंदीकडे प्रस्थान करणार आहे

आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करीत बुधवार दि.28/06/2023 रोजी पंढरपूर या ठिकाणी पोहोचणार आहे.व एकादशी करून द्वादशी प्रसाद घेऊन तद् नंतर परतीचा प्रवास करणार आहे.तरी तालुक्यातील, जिल्यातील सर्व भाविकांनी या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन या नाम यज्ञाचा लाभ घ्यावा असे आवाहन
दिंडी सोहळ्याचे चालक, प्रमुख गुरूवर्य ह भ प अतुलजी महाराज देशमुख गांजे अध्यक्ष- नारायण श्रीपती धनावडे मामुर्डी.उपाध्यक्ष- अंजनाबाई भोसले खजिनदार – भजन सम्राट तुकारामजी देशमुख गांजे, कार्याध्यक्ष -विठ्ठल दगडू सापते निझरे.मा.अध्यक्ष ह भ प रामचंद्र महाराज पवार निझरे. सचिन मगरे,नाना कदम सचिन जवळ मेढा.विलास आबा पवार, शंकर जवळ दत्तात्रय खताळ, ह भ प विठ्ठल महाराज कदम ह.भ.प युवा किर्तनकार दिपेश महाराज जाधव,यांच्या वतीने करण्यात आले आहे.


जुन महीणा आला की वारकर्‍याला ओढ लागते ती वारीची, विठूरायाच्या भेटीची . या दिंडीमुळे वर्षभर वारकरी हा जणु काय चार्जीग होतो ही उर्जा त्याला वर्षभर जगण्याची उमेद देते वारी म्हटलं कि अनेक संताच्या पायी दिंड्या व त्यातील विविध खेळ, फुगडया,रिंगण मुळे वारकर्यां ला हा सुख सोहळा स्वर्गी नाही असेच वाटते हा सुख सोहळा पाहणेसाठी सर्व भाविकांनी तन- मन-धनाने सहभागी व्हावे .
ह भ प ज्ञानदेव भाऊ धनावडे
मा अध्यक्ष व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र ,जावली तालुका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button