मेढा प्रतिनिधी: सुनिल धनावडे.
जावलीची राजधानीतील मेढा नगरपंचायत निर्माण झाल्यावर विकास आराखडा तयार करण्यात आला.यात नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अन्यायकारक विकास आराखडा व वाढीव चतुर्थकर आकारणी, शास्ती कर स्थगित न करता रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मेढा ग्रामस्थ व रहिवासी शेतकरी बचाव संघाच्या वतीने मेढा बाजारपेठच्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत मेढा शहरात गुरुवारी कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला.अत्यावश्यक सेवा वगळता मेढा शहर पूर्णपणे बंद असल्याने सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळत होता.
अन्यायकारक विकासा आराखडयाबाबत बाधित शेतकरी बांधवांनी नगरपंचायतीकडे आपल्या हरकती नोंदवल्या आहेत. अन्यायकारक करवाढी बरोबरच विकास त आराखडा मान्य नसल्याचे शेतकऱ्यांनी आपल्या हरकतीमध्ये नोंदवले आहे.याबाबत स्थगिती मिळाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र शासनदरबारी तसा कोणताही पत्रव्यवहार नगरपंचायतीकडे आला नसल्याचे नगरपंचायतीने विकास आराखड्या बाबतचे आपले काम सुरू ठेवले होते.बाधित शेतकऱ्यांनी व्यक्तिगत दाखल केलेल्या हरकतीवर म्हणणे मांडण्यासाठी दिनांक 30 व 31 मे रोजी वैयक्तिक व सार्वजनिक हरकतीच्या सोनवणीसाठी एक जून तारीख जाहीर केली होती.
शेतकरी बचाव संघ ग्रामस्थ मेढा यांच्यावतीने याबाबत बैठक बोलवण्यात आली होती. दिनांक १ जून गुरुवारी सार्वजनिक सुनावणी ठेवली होती.यामुळे हा अन्यायकारक विकासाकर रद्द व्हावा, वाढीव करवाढ रद्द व्हावी या मागणीसाठी शासनाला जाग आणण्याकरता रहिवासी शेतकरी बचाव संघ व ग्रामस्थ यांच्या वतीने गुरुवारी मेढा बाजार बंदची हाक देण्यात आली.याला सर्व व्यापारी ग्रामस्थांनी बाजारपेठ बंद ठेऊन उस्फुर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळून आपला निषेध व्यक्त केला.
श्री भैरवनाथ मंदिर ते नगरपंचायत मेढा नगरीतील नागरीक शेतकरी यांनी मोर्चा काढला मोर्चा शांततेत निघाला त्याला तालुक्यातील जनतेनेही साथ दिलेची मोर्चात पहायला मिळाले आराखडा कसा चुकीचा आहे असे मत रहिवाशी बचाव संघातर्फे विविध नागरीक ,पदाधिकारी यांनी अधिकारी यांचे समोर मांडले आणि एकमुखाने सदरचा आराखडा त्वरीत रद्द करावा अशा सुचना वजा मागणी करणेत आली