कुडाळ ता. 25 – जावळी महाबळेश्वर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सोनगाव ता.जावली येथील जयदिप शिंदे यांची तर उपसभापतीपदी कुडाळ येथील हेमंत शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली होती, एकुण 18 संचालकांच्या जागेसाठी ही निवडणुक झाली होती, यामध्ये शेतकरी विकास पँनेलने सर्वच्या सर्व 18 जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एकहाथी सत्ता स्थापन केली होती,
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील या तीन्ही आमदारांनी आपापासातले पक्षीय पातळीवरील गट तट व मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेऊन ही निवडणुक एकत्रित लढवून सर्व जागांवर विजय मिळवला होता, त्यानुसार आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाला 8 जागा, आमदार शशिकांत शिंदे गटाला 5 जागा व आमदार मकरंद पाटील गटाला 5 जागा असा जागावाटपाचा फाँम्युर्ला ठरवण्यात आला होता,त्यामुळे सर्वाधिक जागा आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाच्या निवडून आल्याने आज झालेल्या पदाधिकारी निवडीत सभापतीपदी आमदार भोसले यांचे कट्टर समर्थक जयदीप शिंदे यांची निवड करण्यात आली तर दुसरीकडे आमदार शिंदे गटाकडे उपसभापतीपद गेल्याने आमदार शिंदे गटाकडून हेमंत शिंदे यांना उपसभापतीपदी संधी देण्यात आली.
जावळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे नवनीर्वाचीत सदस्यांची पदाधिकारी निवडीसाठी पहिली बैठक श्री. नानासाहेब रुपनवर, प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मेढा यांचे अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या कार्यालयात गुरुवार ता. २५/०५/२०२३ रोजी संपन्न झाली. बाजार समितीच्या सभापतीपदासाठी श्री. जयदिप शिंदे (सोनगाव ) यांचे नाव श्री. राजेंद्र भिलारे यांनी सुचीत केले त्यास श्री. मच्छींद्र मुळीक यांनी अनुमोदन दिले तसेच उपसभापती पदासाठी श्री.हेमंत शिंदे ( कुडाळ ) यांचे नाव श्री.बुवासाहेब पिसाळ यांनी सुचीत केले त्यास श्री. मनेष फरांदे यांनी अनुमोदन दिले. सभापती पदासाठी व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज प्राप्त झालेने या निवडी बिनविरोध पार पडल्या. नवनिर्वाचीत सभापती, उपसभापती व सदस्यांचे आमदार श्री.छ,शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा.श्री.वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक श्री.राजेंद्रशेठ राजपुरे, जिल्हा बँकेंचे संचालक श्री.ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष श्री.सौरभ शिंदे, श्री.अमितदादा कदम यांनी नवनिर्वाचीत पदाधिका-यांचे अभिनंदन करून पुढीलवाटचालीस शुभेच्छा दिल्या.उपस्थित मान्यवरांचे बाजार समितीचे सचिव श्री.महेश देशमुख यांनी स्वागत करून आभार मानले. निवडीनंतर कार्यकत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.