
मेढा प्रतिनिधी :- धर्मविर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला मामुर्डी गावचे प्रथम नागरीक सरपंच जगन्नाथ राऊ धनावडे यांचे शुभ हस्ते धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थीत मान्यवरांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य बाजीराव धनावडे , वसंत मोरे, सौ सविता धनावडे यांचे हस्ते करून महाआरती करणेत आली श्री शिवसंकल्प फाऊंडेशन गांजे यांचे ६ व्या वर्धापन दिनानिमित शिवतिर्थ मामुर्डी येथुन शिवज्योत पेटवून गांजे गावी नेणेत आली . त्याप्रसंगी श्री शिवसंकल्प फाऊंडेशन चे अध्यक्ष सचिन चिकणे उपाध्यक्ष नितिन चिकणे कार्याध्यक्ष संदिप चिकणे खजिनदार विक्रम चिकणे सचिव सचिन चिकणे इंद्रजीत चिकणे गणेश चिकणे तसेच सेवानिवृत फौजी हणमंत चिकणे मामुर्डी सोसायटीचे संचालक आनंदराव धनावडे उपस्थीत होते कार्यक्रम यशस्वी करणेसाठी शिवभक्त सह्याद्री प्रतिष्ठान जावळी तालुका उपाध्यक्ष केतन धनावडे व अनिल मोरे यांनी श्रम घेतले सदर कार्यक्रमास सरपंच परिषद सातारा जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी,अध्यक्ष सुनिल आण्णा धनावडे नाथ्याबा धनावडे सुनिल धनावडे विजय धनावडे शैलेश चिकणे सुशांत धनावडे विलास धनावडे अनिकेत धनावडे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब चे सदस्य, ग्रामस्थ मंडळ मामुर्डी उपस्थीत होते.


