कुडाळ ता. 27 – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालाय, पुणे अंतर्गत आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ता. 25 ते 27 एप्रिल या कालावधीत राज्यस्तरीय शालेय लॉन टेनिस क्रीडा स्पर्धा सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सातारा येथील छत्रपती शाहू अकॅडमीचा विध्यार्थी वरद संतोष पोळ याने कोल्हापूर विभागातर्फे प्रथम स्थानाचे प्रतिनिधित्व करत विजयी सलामी दीली व तृतीय क्रमांक पटकावला या स्पर्धेतील यशाने त्याने राष्ट्रीय संधात आपले स्थान निश्चित केले आहे. त्याच्या अथक परिश्रमाने आणि खेळातील सातत्याने त्याला हे यश मिळाले त्याचबरोबर शाहू अकॅडमीच्या सर्वेसर्वा सौ. वेदांतीकाराजे भोसले, मुख्याध्यापिका सौ. डिम्पल जाधव, क्रीडा शिक्षक श्री कदम सर यांचे त्याला मार्गदर्शन लाभले, तसेच सातारा जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज
नाईक, श्री. माने सर यांचे देखील सहकार्य लाभले. प्रशिक्षक श्री. विनायक कुलकर्णी (सातारा) व श्री.पार्थ चिवटे (पुणे) यांनी त्यास प्रशिक्षित केले.