कुडाळ ता. 27 – जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्यातील छोटी संस्थाअसून सध्या संस्थेला उत्पऩ्नाचे ठोस साधन नसल्याने बाजार समिती आर्थिक बाजूने कमकुवत आहे, संस्थेची निवडणुक लावून संस्थेला अधिकचा आर्थिक तोटा हेऊ नये या प्रांजळ भुमिकेतून ही निवडणुक बिनविरोध करण्याचा आम्ही प्रयत्न केला, सर्व गट तट व आपाआपासातले मतभेद बाजूला ठेवले, मी व आमदाऱ शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील आम्ही तीन्ही आमदार एकत्र आलो ते आमच्या व्यक्तीगत राजकीय फायद्यापोटी नाही, तर बाजारसमिती उर्जित अवस्थेत आली पाहिजे, टिकली पाहिजे याकरिता आम्ही राजकीय संघर्ष बाजूला ठेऊन एकत्र आलो. मात्र कोणतीही निवडणुक लागली की ती निवडणुक लढवायचीच असा चंग बांधलेल्या व तालुक्यातील सहकारात ज्यांचे काडीचे योगदान नाही अशा प्रवृत्तीमुळेच विरोधकांनी ही निवडणूक लादली आहे, मात्र तालुक्याच्या एकविचारधारेच्या विरोधात जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आता आली आहे असे प्रतिपादन सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बोलताना व्यक्त केले.
कुडाळ ता. जावळी येथे जावळी महाबळेश्वर बाजारा समितीच्या निवडणुकीनिमित्त शेतकरी विकास पँनेलच्या वतीने आयेजित सांगता सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस तेजस शिंदे, कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, संचालक राजुशेठ राजपुरे, हणमंतराव पार्टे, भाजप महिला तालुका अध्यक्षा गीताताई लोखंडे, माजी सभापती अरुणा शिर्के, जयदीप शिंदे, बुवासाहेब पिसाळ यांच्यासह शेतकरी विकास पँनेलचे सर्व उमेदवार, मतदार व कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला, यावेळी आमदाऱ शशिकांत शिंदे हे सभेस उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी मोबाईलद्वारे सभेतील कार्यकत्यांशी संवाद साधला व सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी संदिप परामणे यांनी सुत्रसंचालन केले तर उमेदवार प्रमोद शिंदे यांनी आभार मानले.