जावळीजिह्वाराजकीय

सुशिक्षित व प्रगतशील दृष्टीकोऩ गाव म्हणून वालुथ गावाचा नावलैाकीक – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले- वालुथ – करहर पूलाचे उदघाटन व विविध विकासकामांचे लोकार्पण

कुडाळ ता. 25 – गाव पातळीवर असो किंवा जिल्हा पातळीवरील असो, पदे सर्वांना मिळतात परंतू त्या पदाचा वापर आपल्या गावासाठी व भागासाठी कोण कसा करतो, पद मिळाल्यावर त्याचा उपयोग कसा करून घेतो त्यावरच त्या पदाचा मान राखला जातो, कोणतेही काम करताना समयसुकता गरजेची असते, कोणते काम कधी व कोणाकडून केले पाहीजेत यासाठी योग्य नियोजन असणे गरजेचे असते, कोणतेही नेतृत्व कोणीही दाबू शकत नाही, जो समाजकार्यात सतत कार्यरत असतो त्याला नक्की संधी मिळत असते, जो सातत्याने समाजात वावरतो, झगडतो त्याला न्याय नक्की मिळतो, अशा शब्दात समाधान पोफळे यांच्या कामाची दखल घेत समाधान पोफऴे यांना अशा ठिकाणी नेणार कि गावाचे व त्याचे नक्की समाधान होईल, असे मत सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त करून गैारवोदगार काढले.

वालुथ येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध विकासकामांचे उदघाटन तसेच गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सोहळा, अशा विवध कार्यक्रमांचे आयेजन करण्यात आले होते त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते, यावेळी कार्यक्रमास वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे, सैारभबाबा शिंदे, अरूणाताई शिर्के, जयदिप शिंदे, गुलाबराव भिलारे, प्रमोद शिंदे, योगेश गोळे, रमेश बामणे, माजी सरपंच समाधान पोफळे, सरपंच मणिषा भोसले, शिवराम पोफळे, शेखर भिलारे, संदिप पोफळे, यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते, पुढे बोलताना आमदार भोसले म्हणाले, सरपंच समाधान पोफळे यांनी सांगितल्याप्रमाणे गावात कोट्यावधी रूपयांची कामे झाली आहेत, जावळी तालुक्यातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून वालुथ गावाचा नावलैाकीक आहे, येथील अनेकजन वकील, इंजिनिअर, उदयोजक व अधिकारीम्हणून कार्यरत आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने गावाचा प्रगतशिल दृष्टीकोण असून अशा गावाचालोकप्रतिनिधी म्हणून मलाही अभिमान आहे, या गावासाठी वाट्टेल तेवढा निधी देण्यासाठी मीकायम कटीबध्द असल्याचेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वालुथ करहर-कुडाळ नदीवरील पूलाचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले तसेच वालुथ जरेवाडी रस्त्यावरील साकव पूल, मल्हारनगर येथे समाजमंदिर बांधकाम पूर्ण, स्मशान भूमी बैठक व्यवस्था व सुशोभिकरण, गोळेवाडा ते समाधान चौक बंदिस्त गटर पूर्ण, प्राथमिक आरोग्य केंद्र संरक्षण भिंत व पेवर्स ब्लॉक व सुशोभिकरण, आदर्शनगर येथे हायमास्ट लॅम्प, वालुथ करहर रस्ता मातीकाम पूर्ण, वालुथ अंतर्गत चौक आणि रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण, कुडाळी नदीवर गणपती घाट बांधकाम पूर्ण, गाव अंतर्गत पाणंद रस्ते खुले करुण मुरमीकरण पुर्ण, वालुथ करहर रस्त्यावर बंदिस्त गटर बांधकाम पुर्ण, घोलट रस्त्यालगत ओढ्यावर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण, आदर्शनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटारे पुर्ण, संपुर्ण गाव अंतर्गत सर्व बंदिस्त गटर बांधकाम पुर्ण आदी सर्व कामांचे लोकार्पण करण्यात आले,

तसेच वालुथ करहर रस्तामुरमीकरण खडीकरण व डांबरीकरण करणे, राधाकृष्णनगर (बामणेवाडी) रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे राधाकृष्णनगर (बामणेवाडी) साठवण टाकी व वितरण व्यवस्था करणे, वालुथ रामवाडी पिंपळी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, वालुथ जरेवाडी नविन रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, स्मशानभुमी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे आदी नविन कामांचे भूमीपूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष समाधान पोफळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button