जावळीजिह्वाराजकीय

जावली महाबळेश्वर बाजार समितीची निवडणुक अखेर लागलीच – बिनविरोधच्या प्रयत्नांना अपयश – १२ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात तर ६ जागा बिनविरोध

कुडाळ ता. 20 – जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ जागा बिनविरोध करण्यात सर्वपक्षीय नेत्यांना यश आले असले तरी १२ जागांसाठी २२ उमेदवारांनी आपले अर्ज न काढल्याने अखेर बाजार समितीच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे.गेल्या महिना भरापासून बाजार समितीच्या निवडणुकीमुळे जावलीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते, निवडणुक लढवायची की बिनविरोध करायची याबाबत तालुक्यातील गटा तटात अनेक राजकीय खलबते झाली होती, मात्र आज गुरूवार ता. 20 रोजी १२ जागांसाठी २२ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहील्याने अखेर सर्वच राजकीय गटांना निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली,

या निवडणुकीत राजकारणातील नविन फाँम्युला उदयास आला असून आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या कार्यकत्यांशी समन्वय साधून आर्थिक अडचणीत असणाऱ्या संस्थेची निवडणूक लागू नये या उद्देशाने पक्षीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित येण्याचा निर्णय घेतला मात्र या प्रक्रियेमध्ये दोन्ही शिवसेना गटाचा कुठेच विचार न झाल्याने त्यांनी निवडणुकीला सामोरे जाणे पसंद केले. दरम्यान माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार, शिवसेना दोन्ही गटाचे नेते व कार्यकर्ते यांनी एकत्र येवून त्यांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने अखेर हि निवडणूक लागली आहे.

यामध्ये कृषीपत व बहुउद्देशीय सेवा सह. संस्था मतदार संघातुन सर्वसाधारण ७ जागांसाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये गणेश आनंदा कवी, रविंद्र बबनराव गोळे, लक्ष्मण बाबुराव जाधव, भास्कर आबाजी पवार, मधुकर बबनराव पोफळे, राजेंद्र सखाराम भिलारे, सर्जेराव दादु मर्ढेकर, मच्छिद्र लक्ष्मण मुळीक, हनुमंत सहदेव शिंगटे, जयदिप शिवाजीराव शिंदे, प्रमोद शंकर शिंदे, हेमंत हिंदुराव शिंदे आणि प्रमोद बाजीराव शेलार यांचे अर्ज शिल्लक राहीले आहेत.
तर ग्रामपंचायत मतदार संघातुन सर्वसाधारण २ जागांसाठी ४ उमेदवार उभे असून यामध्ये बजरंग पांडुरग गुजर, गुलाब विठ्ठल गोळे, साईबाबा दगडू जगताप आणि बुवासाहेब एकनाथराव पिसाळ तसेच अनुज्ञप्तीधारक व्यापारी, आडते मतदार संघातुन २ जागांसाठी ३ उमेदवार रिंगणात असून दत्तात्रय कोंडीबा कदम, प्रकाश कृष्णाजी जेधे व रमेश लक्ष्मण सपकाळ तर ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसचित जाती / जमाती प्रतिनिधीच्या एका जागेसाठी विद्या तुकाराम कदम आणि पांडूरंग कारंडे निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.

तर कृषी पत व बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मतदार संघातुन महिला प्रतिनिधी म्हणून कमल दिलीप दळवी व योगिता राजेंद्र शिंदे तसेच कृषी पत व बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मतदार संघातुन इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी मनेश जयसिंग फरांदे बिनविरोध निवडून आले असुन कृषी पत व बहुउद्देशीय सेवा सह. संस्था मतदार संघातुन विमुक्त जाती भटक्या जमाती प्रतिनिधी तुकाराम जानु शिंदे तर ग्रामपंचायत मतदार संघातुन आर्थिक दृष्टया दुर्बल घटक प्रतिनिधी रामचंद्र धोंडीबा भोसले तसेच हमाल, मापाडी मतदार संघातुन सुंदर गोंविद भालेराव हे बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाचे तीन तर आमदार शशिकांत शिंदे,व अमितदादा कदम यांच्या गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले स्वतः जातीने सहाय्यक निबंधक कार्यालयात उपस्थित होते.जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकासाठी ता. २८ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून ता. २९ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी दिली. निवडणूक निरक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी जिवन गलांडे यांचे मार्गदशनाखाली सहाय्यक निरीक्षक तथा नायब तहसिलदार संजय बैलकर हे यावेळी उपस्थित होते. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे समवेत वसंतराव मानकुमरे, अमितदादा कदम ,राजेंद्र राजपुरे ,ज्ञानदेव रांजणे, सैारभबाबा शिंदे, संजय गायकवाड, जयदिप शिंदे, राजेंद्र भिलारे, सुरेश पार्टे, शिवाजीराव देशमुख, नारायण शिंगटे, प्रकाश कदम,अरविंद जवळ, सागर धनावडे, रवी शेलार, आनंदा कांबळे, आनंदा परिहार, विलास दुंदळे, विठठल पवार , सोमनाथ कदम, समिर डांगे , संदिप पवारमोहन देशमुख , महादेव ओंबळे, बाळासाहेब ओंबळे, इत्यादी उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button