कुडाळ ता. 18 – जावळी तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या कुडाळ गावच्या स्मशानभुमीच्या जागेचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी साताराचे जिल्हाधिकारी श्री. रुचेश जयवंशी यांच्यासोबत मंगळवार ता. 18 रोजी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे, कुडाळ सोसायटीचे अध्यक्ष मालोजीराव शिंदे, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, विद्यमान सरपंच सैा. सुरेखा कुंभार, यांच्यासह रयत पँनेल व समर्थ पँनेलचे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
१३ एप्रिल २०२३ रोजी आमदार श्री छ शिवेंद्रराजें भोसले यांनी कुडाळ यात्रेनिम्मितमंदीराला भेट दिली असताना त्यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत असताना मंदीरा लगतच्या स्मशानभूमीला भेट दिली होती आणि जागेची पाहणी केली होती त्यांनतर सैारभबाबा शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनुसार आमदार भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज ग्रामस्थांची तातडीची बैठक आयोजित केली, आणि पाहणी केल्यानंतर फक्तं चारच दिवसात तात्काळ सदरचा प्रश्न मार्गी लावला.
जावली तालुक्यातील कुडाळ येथील हिंदू स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे अंत्यविधीला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. रात्री-अपरात्री तसेच पावसाळ्यात चिखलामुळे अंत्यविधीला जाता येत नव्हते. नागरिकांची ही अडचण ओळखुन सातारा जावलीचे आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या प्रयत्नांतून 5 लाखांचा निधी नुकताच दीला होता त्यामुळे रस्त्याचे काँक्रीटीकरण पुर्ण झाले आहे, मात्र स्मशानभुमीच्या लगतचा परिसर ग्रामपंचायतीच्या नावावर नसल्याने तेथील सुधारणा सोई सुविधा रखडल्या होत्या त्यामुळे सदरचा जागेचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे असल्याने आमदार भोसले यांनी अत्यंत जलद गतीने हा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार भोसले यांनी केलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून आभार मानले.