कुडाळ ता. 11 – अनेक तिर्थक्षेत्रांपैकी कुडाळ ता. जावळी येथील श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर या देवस्थानची वार्षिक यात्रा बुधवार ता. 12 पासून सूरू होत असून दोन दिवस भरणाऱ्या यात्रेसाठी आवश्यक ती सर्व तयारी झाली असल्याची माहीती यात्रा समितीचे अध्यक्ष सुनिल रासकर व सहकाऱ्यांनी दिली आहे.
श्री. पिंपळेश्वर व श्री वाकडेश्वर देवस्थानची प्रचिती महान असल्याने संपुर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक यात्रेनिमित्त श्रीं च्या दर्शनासाठी दरवर्षी कुडाळ येथे येत असतात. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी ग्रामस्थ, ग्रामपंचायत व यात्रा समितीकडून करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त मंदिराच्याशिवमहाद्वारावर व संपुर्ण मंदिरावर आकर्षक विदयुत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. जावळी तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असल्याने मंदिर परिसरात विविध खेळण्यांच्या तसेच मेवा मिठाईंच्या दुकांनांनी परिसर गजबजून गेला आहे. संपुर्ण गावात उत्साहाचे वातावरण असून यात्रेच्या मुख्य दिवशी बुधवारी ता. 11 रोजी मानांच्या काठ्यांची मिरवणुक व रात्री छबिना तसेच गुरूवार ता. 25 रोजी प्रसिध्द तमाशा कलावंत हरिभाऊ बडे सह शिवकन्या नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा व जंगी कुस्त्यांचे मैदान असे विविध कायर्क्रम होणार आहेत.