कुडाळ दि .29 – आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आनेवाडी ता.जावली येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांच्या वतीने कराड येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित कृष्णा हाँस्पीटल यांच्या सहकार्याने सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी तज्ञ डाँक्टरांच्या सहकार्याने उपस्थित शेकडो रूग्नांनी या शिबिराचा लाभ घेतला, उपस्तित रुग्णांना यावेळी आवश्यक उपचार करून मोफत आौषधे देखील देण्यात आली, कार्यक्रमाच्या सुरूवातीस आमदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले
यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे जावली तालुक्याचे विद्यमान आमदार असून त्यांचा वाढदिवस हा खरा अर्थाने जावलीतील जनतेसाठी मोठा आनंदाचा दिवस असतो, आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम सर्वत्र साजरे होत असतात मात्र सामाजिक भान ठेऊन रुग्णांची सेवा करणे एक मोठी जबाबदारी आहे आणि म्हणूनच या सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करून जनतेची यामाध्यमातून एक प्रकारे खूप मोठी सेवा घडणार या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे आयेजक सैारभबाबा शिंदे यांनी सांगितले,
यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून हे आरोग्य शिबीर सैारभबाबा शिंदे व आनेवाडी ग्रामस्थांनी घेतले आहे, या आरोग्य शिबिरांने तालुक्यातील गरजू रूग्णांना नक्कीच मोठा फायदा होईल, वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल आमदार भोसले यांनी कौतुक केले, यावेळी प्रतापगडचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे, जेष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगडचे उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, माजी संचालक दादा पाटील, व्हाईस चेअरमन अंकुशराव शिवणकर मुरलीधर शिंदे, आनंदराव जुनघरे,
नाना पवार, बाळासाहेब निकम, बाळासाहेब पाटील, माजी सरपंच विवेक पवार, सोसायटी चेअरमन विजय फरांदे, जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष मोहनराव जगताप,शिवाजी मोरे, संजय निकम, संकेत फरांदे, अमित फरांदे, घनश्याम फरांदे,
दिलीप फरांदे, शिवाजी फरांदे, मनोज फरांदे, संकेत फरांदे, सुमित फरांदे यांच्यासह ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येनेउपस्थित होते. दादा पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, मुरलीधर शिंदे यांनी आभार मानले.