जावळीजिह्वाराजकीय

आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या माध्यमातून जावलीतील गावे सुजलाम सुफलाम होणार – ज्ञानदेव रांजणे – आसनी व केळघर येथील विकासकांमाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

कुडाळ दि.22 – जावली तालुक्याचे लोकप्रिय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जावली तालुक्यात प्रत्येक गावागावात व वाडी वस्तीत विकासाची गंगा पोहोचवत तालुक्यातील सर्व गावे सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू असून प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांचा फंड उपलब्ध झाला असून प्रत्येक गावात विकास कामे सुरू आहेत. सध्या राज्यात असलेले शिंदे फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावली तालुक्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे त्यामूळे प्रत्येक गावात मूलभूत सुविधा पोचवण्याचे काम आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे. असे मत जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी बोलताना व्यक्त केले.

जावली तालुक्यातील मौजे आसनी आणि केळघर या ठिकाणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या आमदार फंडातून मंजूर असणाऱ्या कामांचा भूमिपूजन सोहळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी तो बोलत होते,
आसनी येथे जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत कार्यालयासाठी 12 लाख रूपये, मंदिर परिसर सुशोभीकरण करणे 10 लाख,
केळघर येथे बंदिस्त गटर 10 लाख रुपये या कामांचा भूमिपूजन सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
पुढे बोलताना श्री रांजणे म्हणाले, येत्या आठवड्यात केडंबे विभागाला जोडणारा नांदगने पूनवडी पूलाचा भूमिपूजन सोहळाही लवकरच संपन्न होत आहे त्याच दिवशी आंबेघर ते बोंडारवाडी रस्ता व असनी ते म्हाते रस्ता केळघर ते गढवली रस्ता अशा विविध कामांचा भूमिपूजन सोहळाही आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थित होणार असल्याचे श्री ज्ञानदेव रांजणे यांनी सांगितले

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे अर्थ आणि जलसंपदा खाते असल्याने बोंडारवाडी धरणाचा मार्ग देखील सुकर होणार आहे. लवकरच बोंडारवाडी धरण संदर्भात मागील आठवड्यात मंत्रालयात झालेले मिटींगचे मिनिट प्राप्त झाले बरोबर सर्वे साठी 80 लाखाचा निधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ज्ञानदेव रांजणे,
सागर धनावडे,मोहन कासूर्डे,हरिभाऊ शेलार,नाना जांभळे,बबन बेलोशे ,भाऊ जाधव, आसनी आणि केळघर व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button