महेश बारटक्के – प्रतिनिधी
कुडाळ ता. 2 – सातारा जिल्हा शिंपी समाज अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जावळी तालुक्याच्या वतीने नासपचे राज्य अध्यक्ष संजीव तुपसाखरे यांचे उपस्थितीत सत्कार संपन्न झाला याचवेळी राज्याध्यक्ष तुपसाखरे साहेब यांचा देखील राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जावळी तालुका अध्यक्ष अविनाश कारंजकर, जिल्हा परिषद सदस्या सैा.शोभाताई बारटक्के यांच्यासह समाजबांधवांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अविनाश करंजकर यांनी केले यावेळी बोलताना जावळी तालुक्यातील समाजाच्या अडीअडचणी मांडल्या व भविष्यात करणार असलेल्या कामांचा ऊहापोह केला सत्काराला उत्तर देताना इंजिनियर पोरे यांनी सर्वप्रथम जिल्ह्यातील समाज बांधवांची जनगणना करणार असून जनजागृती, सामाजिक एकत्रीकरण या बाबी अग्रक्रमाने करणार असल्याचे सांगितले तर राज्य अध्यक्ष तूप साखरे साहेब यांनी राज्यभर सातारा जिल्ह्याचा आदर्श घेऊन समाज जनगणना, एकत्रीकरण आदी बाबी करून पंढरपूर येथे शासनामार्फत बांधल्या जाणाऱ्या संत शिरोमणी नामदेव स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे सुतवाच केले
यावेळी श्रीकांत आंबेकर नगरसेवक सातारा धनंजय खटावकर, सकाळचे पत्रकार बारटक्के आदींनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन श्री खटावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी खटावकर हिने केले यावेळी सौ वॄशाली तुपसाखरे, वासंती राहणे, सुवर्णा पोरे, शोभा बारटक्के,धनश्री कारंजकर, सातारा, कुडाळ, मेढा विभागातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली जिल्ह्यात अशा प्रकारे होत असलेल्या कार्यक्रमाने समाजात चैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याची भावना समाज बांधवांनी व्यक्त करीत होते