जावळीजिह्वासामाजिक

किल्ले वैराटगड येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न – सह्याद्री टुडेचे पत्रकार सुनिल धनावडे यांचा शिवभुषण पुरस्काराने सन्मान

मेढा प्रतिनिधी :-अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे मालक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा शिवक्रांती हिंदवी सेना तर्फे श्री किल्ले वैराटगड स्वराज्याचे शस्त्रागार येथे पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला. सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी श्री किल्ले वैराटगडावर गेली . शिवक्रांतीने स्थापन केलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीस विधिवत अभिषेक त्याचप्रमाणे श्री वैराटेश्वर आणि गडदेवतांची पूजा करून पालखी गडावरून खाली आली.कापसेवाडी येथील हुतात्मा जवान सुरज मोहिते यांच्या स्मारकास पॅरा कमांडो मयूर जाधव यांचे हस्ते मानवंदना व पुष्पहार अर्पण करण्यात आला.संत ज्ञानोबाराय वारकरी संस्था तर्फे विठूनामाचा गजर करीत पालखी गावातून कार्यक्रम स्थळी आली. मेढा पोलीस अधीक्षक आ.संतोष तासगावकर यांनी स्वराज्य ध्वजास मानवंदना दिली.शिवरायांचा पाळणा व शिवराज्याभिषेक ह्या धार्मिक विधी पार पडलेवर उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा झाला.

शिवक्रांतीचे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील धनावडे यांनी शिवक्रांतीच्या कार्याची प्रस्तावना केली.गडकिल्ले संवर्धन आणि शिवकार्याचे प्रसार याबद्दल माहिती दिली.आपल्या सर्वांचा ऊर्जास्रोत शिवाजी महाराज यांचा जन्म दिवस म्हणजे शिवजन्मोत्सव सोहळा होय आणि त्याचा उल्लेख देखील शिवजयंती न करता शिवजन्मोत्सव करावा असे सुचवले, मा.अमितदादा कदम यांनी शिवक्रांतीच्या कार्याचे कौतुक केले. श्री.संतोष तासगावकर सर यांनी शिवकार्याची दखल घेत कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.उपस्थित मान्यवर हस्ते अक्षय इंगवले (म.पो.) मित्रमेळा फॉऊंडनेशन जावळी,कमांडो अकॅडमी सातारा,युवा मोरया प्रतिष्ठान सातारा , संजीवन बहुउद्देशीय संस्था सातारा, दै सत्य सह्याद्री चे पत्रकार सुनिल आण्णा धनावडे वसीम शेख, संतोष मालुसरे , तबरेज बागवान, रजिया शेख , दुर्गनाद प्रतिष्ठान, जिजाऊ महिला ग्रामसंघ कण्हेर,यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ सोशिअल वर्क सातारा यांस शिवक्रांती शिवभूषण पुरस्कार २०२३ देऊन गौरविण्यात आले.शिवक्रांती ऑनलाईन इतिहास प्रश्नमंजुषा पर्व ४ मध्ये महाविजेती ज्योती वांगडे व महाविजेता नितीन धनावडे यांस पारितोषिक तसेच इतर विभागातील विजेते आणि राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले निबंध स्पर्धा पर्व ४ यांचे देखील पारितोषिक वितरण करण्यात आले.संकेत माने पाटील व शशिकांत चिकणे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली व महाप्रसाद झालेनंतर समारोप केला.


सदर सोहळ्यास सहायक पोलीस अधीक्षक संतोष तासगावकर , अमितदादा कदम,रुपालीताई भिसे,शिवभक्त गणेश अहिवळे , सरपंच परीषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी ह भ प संतोष महाराज महामुलकर कुडाळ पत्रकार इम्तियाज मुजावर सादीक मुजावर संदीप माने , नवनाथ दादा धनावडे,वसंत धनावडे ,दिलीप धनावडे ,जीवन बोराटे ,दत्तात्रय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.श्री.हरेश नागपाल व श्री योगेश जंगम यांनी महाप्रसाद आणि इतर कार्यात विशेष सहकार्य केले.शिवक्रांती उपाध्यक्ष प्रवीण कदम,सुधीर कांबळे,रोहित जगताप,निखिल घोरपडे,अमोल खोपडे, सुमित कांबळे.सागर गायकवाड,आदित्य जाधव,जगनाथ शिंदे,कुमार सुळके,निखिल कुर्लेकर,मुकुंद गायकवाड,देवांग चव्हाण,महेश शिंदे,प्रदीप कदम,सुरज महाडिक,अनिकेत जाधव ,पूर्वेश शिंदे , गोविंद शिंदे ,संतोष गोरे ,प्रतीक्षा प्रदीप कदम,अर्चना चिकणे ,सुप्रिया पवार ,शीतल जुनघरे,अश्विनी नेवसे यांचे विशेष सहकार्य लाभले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button