मेढा (सोमनाथ साखरे ) – पानिपतच्या युध्दात महाराष्ट्राची मोठी पिढी खर्ची पडली ती कशासाठी तर भारताला भारत ठेवण्यासाठी महाराष्ट्र दिल्लीत धावुन गेला होता. भगव्या झेंड्याची शपथ घेवुन द्वारका, मथुरा, काशिविश्वेश्वर, पंढरपूर तिर्थक्षेत्र टिकण्यासाठी मराठा एकवटला होता. या देशाचे इस्लामीकरणाचा डाव कोणी उधळला असेल तर तो महाराष्ट्रविरांनी उधळविला आहे. सातारच्या रक्तातच इतिहास आहे असे धनंजय महाराज देसाई यांनी सांगीतले.मेढा येथील तालुक्याच्या मुख्यालयात हिंदु जनआक्रोश मोर्चाच्या समोरप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जावळीचे आमदार श्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर, युवक, महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना धनजंय महाराज देसाई पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांची रणनिती, धर्मनिती ही व्यक्तीगत स्वार्थाची, खुळचट अशा आत्मिक संरक्षणाची नव्हती. तर ती राष्ट्र निर्मितीची होती.स्वतःचे बलीदान करणारे श्री छ. संभाजी महाराज हे आमच्यासाठी नव्हे तर जगासाठी धर्मवीर होते. स्वकियांचे धर्मराष्ट्र सुरक्षित रहावे म्हणुन त्यांनी स्वतःच्या देहाचे बलीदान दिले. औरंगजेब सुध्दा त्यांना धर्मवीर म्हणत होता, गोहत्या, धर्मांतरण आणि लव्हजिहाद यासाठी कडक कायदे झालेच पाहीजेत. आपल्या पिढीला पुन्हा असे मोर्चे काढावे लागु नयेत यासाठी संसदेत देवधर्म माननारे खासदार संसदेत पाहीजेत. हिंदुच्या विरोधात असणारा राजकीय पक्ष उपटून काढला पाहीजे असेही आवाहन यावेळी धनंजय महाराज देसाई यांनी केले.
यावेळी आमदार श्री छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलताना म्हणाले, हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही, याविषयी कोणी वेगळी भावना निर्माण करू नये, परंतु हिंदु धर्मावर येत असलेल्या संकटावर आहे. राज्य शासन, केंद्र शासन व प्रशासन यांच्या पर्यत असणारी धर्मा बाबतची भविष्यातील भिती पोहचविण्यासाठी हा मोर्चा आहे असे सांगुन छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य काहीजण करतात व त्यांना छोटे करण्याचे काम काहीजण करत आहेत आणि हे एक षढयंत्र आहे परंतु कोणी स्वतः ची राजकीय पोळी भाजण्यासाठी छत्रपती शिवाजी महारांजांना कमी दाखविण्याचे काम केले तर हे आम्ही कदापी खपवुन घेणार नाही असा इशारा यावेळी आ. भोसले यांनी यावेळी दिला.
दरम्यान मेढा बसस्थानकापासुन मोर्चाला सुरुवात होवुन तो पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालय व नंतर पोलीस ग्राऊंड पर्यत आणण्यात येवुन तेथे संगता सभा घेण्यात आली. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतरण विरोधी कायद्यांसह आदी मागण्यांचे निवेदन युवतींच्या हस्ते तहसिलदार यांना देण्यात आले. या मोर्चामध्ये युवती व महिलांचा उत्स्फुर्त सहभाग होता. हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होवून विविध घोषणा देत होते.मोर्चा यसस्वी करण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले.