कुडाळ (प्रतिनिधी) : जावळी तालुक्यातील मेढा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदु जन आक्रोश मोर्चाचे सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे . तरी या मोर्चास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
लव्ह जिहाद ,धर्मातरण ,गोहत्या याच्या विरोधात कडक कायदा करून तो देशासह राज्यात लागू करावा यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . जावळीकरांनी एकत्र येऊन धर्म कार्यात आपला सहभाग नक्कीच नोंदवावा.
मुबंईसह राज्यातील विविध ठिकाणी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदु जन आक्रोश मोर्चे निघाले .याच सर्व गर्दीचा उच्चाक मोडून आपण सर्व माता भगिनी, युवक मित्र यांनी या मोर्चात हजारोच्या संख्येने उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले आहे.या मोर्चास ठीक 12 वाजता एस टी स्टॅण्ड मेढा येथून सुरुवात होणार आहे.या मोर्चा साठी गेल्या 15 दिवसांपासून गावागावांत जाऊन जनजागृती करण्यात आली आहे, त्यामुळे जावलीतील ऐतिहासिक गर्दीचा हा समभाव्य मोर्चा असेल असा विश्वासही आयोजकांनी व्यक्त केला आहे.
हा मोर्चा कोणत्याही राजकिय पक्षाच्या किंवा संघटनांच्या विरोधात नसून तो हिन्दू हितासाठी आहे. गोवंश हत्या बंदीचा कायदा अस्तित्वात आहे पण कार्यवाही होत नाही. गोरक्षक कार्यवाही साठी गेले असता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. लव्ह जिहाद ची पुणे जिल्ह्यात रोज एक केस आहे. लव्ह जिहादचं संकट कधी तुमच्या मुलीपर्यत, बहिणीपर्यंत, वहिणीपर्यत दबक्या पावलाने घरात पोहोचेल सांगता यणार नाही. हजारो धर्मांतरणे मिशनरी अंतर्गत गेल्या वर्षाभरात झालेली आहेत, तुमच्या परिस्थिती चा गैर फायदा घेऊन मदतीच्या नावाखाली सर्रास धर्मांतरणे घडवली जातात. धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंच्या बलीदानाचे स्मरण संपूर्ण विश्वाला व्हावे म्हणून फाल्गुण अमावस्येला धर्मवीर दिन घोषित व्हावा या मागणीसाठी हा मोर्चा आहे. भगव्याप्रती, हिन्दुत्वाप्रती आणि राष्ट्राप्रती काम करणारा कोणत्याही पक्षाचा किंवा धर्माचा व्यक्ति आमचा आहे. हिन्दुत्व हेच राष्ट्रीयत्व या विचाराला स्मरूण या राष्ट्र कार्यात सहकुटुंब सहभागी व्हा.