मेढा प्रतिनिधी :-छत्रपती शिवाजी महाराजाचे पदस्पर्शाने पावन झालेल्या मामुर्डी तालुका जावळीची सुकन्या कु.सिध्दी नामदेव मोरे ही निकित्सक समूह शिरोळकर हायस्कुल गिरगाव येथे नववी इयत्तेत शिकत आहे
एअर विंग (एन.सी.सी.) फ्लयिंग कॅम्प पुणे येथे हेलीकॉप्टर चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी तिची निवड झाली व सिद्दी हिने एअर फोर्स स्टेशन पुणे येथे हेलिकॉप्टर चे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या प्रशिक्षणात हेलिकॉप्टर W-3905 (wirus)हे 700 ते 800 मीटर पर्यंत उडवण्यात आले.तेथे तापमान 62°C होते. ग्रुप कॅप्टन संग्राम नायक सर यांच्यासोबत 2 seater हेलीकॉप्टर मध्ये बसून स्वतः हेलीकॉप्टर चालवले संग्राम नायक यांच्यासोबत हेलीकॉप्टरचे उड्डाण केले.. व हेलीकॉप्टर चालवण्याचे प्रशिक्षण नायक सर यांच्यासोबत घेतले त्याबद्दल तिचे ग्रामस्थ मंडळ मामुर्डी श्री केदारेश्वर भजन मंडळ आय एस ओ मानांकित जि प शाळा मामुर्डी तसेच आम्ही जावळीकर तर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.