मेढा प्रतिनिधी :- 12 जानेवारी ते 19 जानेवारी ते 2023 या शैक्षणिक वर्षात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा तालुका जावली जिल्हा सातारा येथे आज 12 जानेवारी 2023 रोजी श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
या जयंतीच्या निमित्ताने स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष श्री विकास देशपांडे तसेच शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री सचिन करंजेकर व स्थानिक सल्लागार समिती सदस्य श्री सुरेश पार्टे यांनी उपस्थिती दाखवली व प्रतिमापूजन व विविध रथांचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडले त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्या एन एस पाटील मॅडम व श्री कदम एन ए जुनिअर इन्चार्ज व पर्यवेक्षक श्री कांबळे एन जे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होत्या
संपूर्ण प्रभातफेरीचे नियोजन श्री साबळे सर श्री उंबरकर सर श्री माने एस एस श्री शिंदे सी.जे यांच्या कल्पकतेने पार पडले या कार्यक्रमाची सुञसंचालनाची जबाबदारी कु शर्वरी देशपांडे व सारण्या मोरे इयत्ता 10 वी अ यांनी पार पाडली अध्यक्ष मनोगत श्री विकास देशपांडे यांनी व्यक्त केले तर शुभेच्छा पर मनोगत श्री सुरेश पार्टे सचिन करंजकर यांनी व्यक्त केले संपूर्ण कार्यक्रमाच्या आभार श्री कांबळे एन.जे यांनी मानले या संपूर्ण रॅलीत सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला