कुडाळ: जावली तालुक्यात पटसंख्येच्यादृष्टीने दोन क्रमांकाची असणारी कुडाळ शाळा आपल्या विविधपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तेने जिल्ह्यात अग्रेसर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत शाळेच्या सात विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले असून परीक्षा परिषदेकडून नुकतीच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.
यामध्ये शाळेच्या ओमराजे गायकवाड (२७२), वैदवी रासकर (२६४), वेदा वारागडे(२६२) श्रेयस जमदाडे(२५८), अनुष्का शेवते(२५४), श्रीनाथ रासकर(२५२), आयुष जाधव(२४२), स्वरा बारटक्के(२४०), स्वराज पवार(२४०) या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे
एकूण ३२ विद्यार्थी पात्र झाले आहेत. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीतही शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. तालुक्याचा शिष्यवृत्ती पॅटर्न अबाधित ठेवत सन २०२१-२२ च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील सात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्तीची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. या विद्यार्थ्यांना सौ.मेघा चव्हाण,सौ.ज्योत्स्ना वायदंडे ,श्री.बन्सीधर राक्षे,श्री. रघुनाथ जाधव,श्री. संदीप किर्वे, मुख्याध्यापिका जयश्री गायकवाड आदींचे मार्गदर्शन मिळाले.या यशाबद्दल जावलीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना तोडरमल ,विस्तारअधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख अरविंद दळवी,पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य ,पालक, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.