कुडाळ : जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महू या शाळेने सलग तिसऱ्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेतील आपली यशस्वी परंपरा कायम राखली आहे. शाळेतील दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत चमकले असून कु. आकांक्षा प्रकाश गोळे हिने 280 गुण मिळवीत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात सातवा क्रमांक पटकावला ,तर जावळी तालुक्यात प्रथम क्रमांकाने ही विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली आहे.महू प्राथमिक शाळा दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षांमध्ये यश मिळवत आलेली शाळा असून शाळेतील मार्गदर्शक शिक्षिका सीमा पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी या शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेतील आपली यशस्वी परंपरा कायम राखण्यात यश मिळवले आहे. शाळेतील आकांक्षा प्रकाश गोळी हिने 280 गुण मिळवून जिल्ह्यात सातवा क्रमांक तर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला तसेच विघ्नेश गणेश गोळे या विद्यार्थ्याने 262 गुण मिळवत तालुक्यात दहावा क्रमांक फटकावून शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
या विद्यार्थ्यांना सीमा पार्टे यांच्यासह शाळेतील ,सुनील माने, खंडू सरवदे, मुख्याध्यापक गजानन वारागडे ,सुरेश पार्टे यांचे देखील विशेष मार्गदर्शन लाभले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण अधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल ,भाग शिक्षणविस्ताराधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख संपतराव धनावडे त्याचबरोबर सरपंच -उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष -उपाध्यक्ष ,ग्रामस्थ यांनी विशेष अभिनंदन केले .