जावळीजिह्वाशैक्षणिकसामाजिक

शाळा- महाविद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ – व्यसनमुक्त युवक संघाच्या उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद.


मेढा प्रतिनिधी :- सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करीत असताना व्यसनाची वाढत चाललेली प्रतिष्ठा, बिभस्तपणाचे होत असलेले प्रदर्शन आणि रात्रभर मद्यपान करण्यास सरकार कडून दिली जाणारी खुली परवानगी देशातील युवा व भावी पिढीसाठी घातक असून याचा बालमनावर होणारा परिणाम लक्षात घेवून नववर्षाची सुरवात “व्यसनमुक्तीची संकल्प शपथ” घेवून करा असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघाचे वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत राज्यभरातील शाळा- महाविद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त रहाण्यासाठी संकल्प शपथ घेवून व्यसनमुक्तीचा नारा दिला आहे.


व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शच गुरूवर्य बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेने गेली २२ वर्षे व्यसनमुक्तीसाठी सातत्याने झगटत असलेल्या व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दरवर्षी दि.३१ डिसेंबर रोजी दारू नको दुध प्या हा उपक्रम राज्यभर राबविला जातो. गतवर्षापासून व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक विलासबाबा जवळ यांचे संकल्पनेतून व राज्याध्यक्ष दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संकल्प शपथ देण्याचे आवाहन करण्यात आले होते.यासाठी गेले २० दिवस प्रत्येक शाळेला भेटी देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते सक्रियपणे काम करीत होते. सोलापूर,पूणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,अहमदनगर, संभाजीनगर,जळगाव, नाशिक,बीड,वाशिम, धाराशिव,लातुर अशा अनेक जिल्ह्यांसह मुंबई-पुणे येथिल शहरी भागात असणार्‍या शाळा- महाविद्यालयातून या चांगल्या ऊपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.


अनेक शाळा महाविद्यालयांमधून व्यसनमुक्त संघाचे व्याख्याते प्रा.धनंजय देशमुख, प्रा.मारूती शेळके, तानाजी पांडूळे,बाळासाहेब शेरेकर, युवावक्ते जगन्नाथ शिंदे यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व- शाळा महाविद्यालयातील गुरूजनांचे राजाध्यक्ष दिपक जाधव यांनी आभार मानले आहेत.
व्यसनमुक्त युवक संघाने राबविलेल्या उपक्रमाला राज्यभरातून मिळालेला प्रतिसाद पहाता शासनाने याच्यावर गांभिर्याने विचार करायला हवा. १ जानेवारी हा नववर्षाचा प्रथम दिवस व्यसनमुक्ती संकल्प दिन म्हणून जाहीर करावा असे आवाहन व्यसनमुक्त संघाचे मार्गदर्शक शहाजी काळे यांनी केली आहे.


व्यसनाधिनतेने अनेक कुटुंबे उध्वस्थ होत असून शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाक्रमा बरोबरच व्यसनांंचे दुष्परिणाम व त्याची दाहकता सांगायला हवी.कॅन्सरच्या हाॅस्पिटल मधील सत्य परस्थिती दाखवायला हवी.एक विद्यार्थी घडला तर अनेक कुटुंबे घडणार आहेत. त्यातूनच बलशाली आदर्श राष्ट्र घडेल.
बंडातात्या कराडकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button