विशाल जमदाडे / प्रतिनिधी
कुडाळ दिनांक 2 :आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी संशोधक आहेत.आजच्या गतिमान युगात या बालवैज्ञानिकांतून भावी संशोधक तयार व्हावा.संशोधन ही काळाची गरज असून देशाच्या विकसित करण्याची जबाबदारी आपणा सर्वाचीच आहे.याकरिता विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होत त्यांची संशोधकवृत्ती वाढीस लागावी.यातून प्रत्येक शाळेत उद्याचा संशोधक तयार व्हावा.असे प्रतिपादन जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केले.
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती जावली शिक्षण विभाग व श्री.धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यानगर याठिकणी आयोजित जावळी तालुका विज्ञान प्रदर्शनच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रगतशील शेतकरी अजित आपटे प्रमुख अतिथी होते.
याप्रसंगी जावळी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, विस्तारअधिकारी चंद्रकांत कर्णे,केंद्रप्रमुख अरविंद दळवी, स्कुल कमिटी सदस्य सुदाम शिंदे,जगन्नाथ पिसाळ,मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष जयवंत तरडे,श्री.धुंदीबाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.बी.जाधव, धनावडे सर, माध्यमिक ,प्राथमिक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित आपटे म्हणाले,विज्ञानाने क्रांती करत अनेक क्षेत्रात आज प्रगती साधली आहे. सामान्यातून असामान्य अशी निर्मिती कशी होते याची अनेक उदाहरणे सांगितली आहेत.यातूनच विद्यार्थी नक्कीच प्रेरणा घेतील.त्यांच्यातील संशोधकवृत्तीला चालना चालना मिळेल आणि यातून भविष्यातील संशोधक तयार होण्यासाठी पायभरणी होईल.
भोसले पी. एस मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. काटवटे एम व्ही यांनी आभार मानले.जावळी तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी मार्गदर्शन केले.