मेढा प्रतिनिधी :- जावळीच्या राजधानीत जावली भाजप तर्फे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या अजित पवार यांच्या विरोधात प्रदेश अध्यक्ष मा.आ.चंद्रशेखर जी बावनकुळे व जिल्हा अध्यक्ष मा. आ. जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार आज सोमवार दिनांक 2 जानेवारी रोजी मेढा येथे सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मेढा येथे मोठ्या जनसहाभागाने तीव्र निदर्शने केली आहेत.या वेळी मंडल अध्यक्ष श्रीहरी गोळे, माजी बांधकाम सभापती श्री विकास देशपांडे, तालुका सरचिटणीस किरण भिलारे, मा जि परिषद सदस्य मच्छिंद्र सुतार, मेढा शहराध्यक्ष विनोद वेदे तालुका उपाध्यक्ष भानुदास ओंबळे, महिला अध्यक्ष वैशालीताई सावंत ,युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्निल ननावरे, सोनिया धनावडे इत्यादी पदाधिकारी व, कार्यकर्ते यावेळी हजर होते.