क्रीडाजावळीजिह्वा

जावळीला कोणी मैदान देता का मैदान… खेळाडूंसह क्रिडाप्रेमींचा सवाल- शालेय क्रिडा स्पर्धा चक्क रस्त्यावर

कुडाळच्या मंजूर क्रिडासंकुलाचे काम लवकर मार्गी लागण्याची आशा

मेढा प्रतिनिधी :- सातारा जिल्हा जसा शुरविरांचा आहे तसा तो खेळाडूंचा सुद्दा आहे जावळीतील बरेच खेळाडू स्वतःचे हिमतीवर राज्य तसेच देशपातळीवर खेळत आहेत खो खो रिले कबड्डी सायकलींग अशा अनेक खेळामध्ये अव्वल आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा समजला जाणारा जावळी तालुका या तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. मैदानी खेळ घेण्यासाठी तालुक्याला मैदान नसल्याने चक्क राष्ट्रीय महामार्गावरच धावण्याच्या स्पर्धा अधिकारी यांचे समोर घेण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. अनवाणी पायानेच विद्यार्थी महामार्गावर धावत होते.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहा ते बारा वर्षांपासून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. याही वर्षी स्पर्धा घेण्याचा उपक्रम घेतला आहे. जावळी तालुक्यात मैदान उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव या स्पर्धा रस्त्यावर घेतल्या जातात. याबाबत शिक्षक काळजी घेतात. परंतु शासनाची जबाबदारी आहे की नाही असा सवाल पालक वर्ग करीत आहे.


जावली तालुक्यातील सावली येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील स्पर्धक मैदानी खेळांमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये शंभर मीटर ते तीन हजार मीटरपर्यंत धावण्याच्या स्पर्धा चक्क महाबळेश्वर-सातारा महामार्गावर घेण्यात आल्या. अनवाणी पायानेच विद्यार्थी महामार्गावरून धावत होते. विद्यार्थी धावत होते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाचा खेळच मांडल्याचे दिसून येत होते
केंद्र सरकार क्रीडा स्पर्धांसाठी मोठमोठी निधी जाहीर करत आहे. खेलो इंडिया म्हणून कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. दुर्गम, डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांसाठी ना खेळाची मैदाने आहेत, ना दळणवळणासाठी रस्ते आहेत. तरी जावळीला कोण मैदान देत का मैदान अशी हाक पालक वर्गासह विद्यार्थी करीत आहेत

यशवंतराव चव्हाण कीडा स्पर्धेत एकीव शाळेने भरारी घेतली,जावली एक्सप्रेस म्हणून संबोधलेल्या कु समृद्धी दत्तात्रय कदम हिने 100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात जावली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला . तर ४x १०० मी रिले धावणे प्रकारात श्रेया सोमनाथ कदम , प्रणाली अकुंश गोरे , ज्योती अकुंश गोरे , समृद्धी दत्तात्रय कदम , नुतन नवनाथ शिर्के या एकीव शाळेच्या चमूने प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्तरावर निवड झाली या खेळाडूंना श्री . सुरेश सपकाळ , मनीषा सातघरे , पूजा प्रभूणे , सुनील शिंदे , प्रकाश धनावडे यांनी मार्गदर्शन केले . व्यवस्थापन कमीटी ग्रामस्थ मंडळ एकीव यांनी अभिनंदन केले

कुडाळच्या क्रीडा संकुलाचे भिजत घोंगडे

खेळाडू आशियाई व जागतिक स्तरावर चमकण्याच्या दृष्टीने त्यांना क्रीडा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सन २००१ च्या क्रीडा धोरणानुसार जावली तालुक्याला क्रीडा संकुल मंजूर झाले. २००३ साली कुडाळ येथील जागा मंजूर होऊन क्रीडा संकुल समितीच्या नावे वर्गही झाली आणि २००६ साली क्रीडा समितीही नोंदणीकृत झाली. सरकारकडून कोटभर निधीही येऊन खात्यात जमा झाला. मात्र, तब्बल 21 वर्षे क्रीडा संकुलाचे भिजत घोंगडे प्रलंबित असून आता तालुक्याचे क्रीडा संकुल होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जातीने प्रयत्न करावेत व तालुक्यातील खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जावली तालुक्यातील क्रीडा प्रेमींनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button