जावळीजिह्वासामाजिक

नववर्षाची सुरवात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती “संकल्प शपथ” देवून करा- व्यसनमुक्त युवक संघाचे शाळा-महाविद्यालयांना आवाहन.

मेढा प्रतिनिधी / सुनिल आण्णा धनावडे –

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असून गेली अनेक वर्ष ३१ डिसेंबर म्हणजे व्यसनाधिनतेचा दिवसच असे काही वातावरण तयार झाले आहे.यादिनी वाढत असलेला बिभस्तपणा लक्षात घेवून याचा विद्यार्थ्यांच्या बालमनावर परिणाम होत असून त्यांचे भविष्यच अंधारमय होण्याची भीती असल्याने आई- वडीलांसह, गुरूजनांनी या पिढीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असून शाळा व महाविद्यालयातून नववर्षाची सुरवात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती “संकल्प शपथ” देवून करा असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक श्री विलासबाबा जवळ यांनी केले आहे.

गुरूवर्य बंडातात्या कराडकर यांचे प्रेरणेने व राज्याध्यक्ष श्री दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र ही संस्था गेली २२ वर्ष समाज व युवक व्यसनमुक्त व्हावा यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य करीत आहे.एकंदरीत अनुभवावरून विद्यार्थी दशेत शालेय शिक्षणा बरोबरच मुलांना दिले जाणारे संस्कार अतिशय महत्वाचे व त्यांच्या पुढील आयुष्याची दिशा ठरविणारे असतात. आई-वडीलांनंतर विद्यार्थ्यांचे खरे पालक हे गुरूजन असतात.गुरूजन ही जबाबदारी आपल्या परीने नक्कीच पार पाडीत असतात.
व्यसनांची वाढत चाललेली उपलब्धतता,शासनाची याबाबत असलेली उदासिन धोरणे,यामुळे तंबाखूजन्य पदार्थांची व मादक द्रव्यांची होत असलेली वाढ यामुळे समाजाची शारिरीक,आर्थिक व सामाजिक मोठी हानी होत आहे.३१ डिसेंबर म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देण्याचा भारतीयांचा नवा सण झाला आहे.या उत्सवाला येत असलेले बिभत्सरूप व या दिवशी वाढत असलेली व्यसनाधीनता रोखणे काळाची गरज असून आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे.

व्यसनमुक्त युवक संघ गेली अनेक वर्ष ३१ डिसेंबरच्या रात्री श्रमदान,प्रबोधनासह विधायक ३१डिसेंबर म्हणून “दारू नको-दुध प्या” हा उपक्रम महाराष्ट्रातील अनेक गावात,शहरात राबवित आहे.
गतवर्षापासून नववर्षाच्या प्रथम दिनी अनेक शाळा- महाविद्यालयातून “१जानेवारी -व्यसनमुक्त संकल्प दिन” या उपक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त रहाण्यासाठी व्यसनमुक्ती ची संकल्प शपथ देवून प्रेरीत करीत आहे.
या वर्षी १ जानेवारीला रविवार सुट्टी असल्याने ३१ डिसेंबर अथवा २ जानेवारी २०२३ रोजी शाळा, महाविद्यालयां मधून हा उपक्रम राबवावा असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघाचे वतीने मार्गदर्शक विलासबाबा जवळ व राजाध्यक्ष दिपक जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button