जावळीजिह्वासामाजिक

कुडाळ येथील पिंपळबनाच्या वैभवात पडणार आणखी भर –
सेल्फी पाँईंटसह संरक्षक भिंतीच्या कामाचे भुमीपुजन संपन्न

महेश बारटक्के
कुडाळ दिनांक 25 (प्रतिनिधी) – गावातील निरुपयोगी व पिढ्यान पिढ्या पडिक राहिलेल्या जागेवर आज पिंपळबनच्या
माध्यमातून नंदनवन फुलले आहे. पिंपळबनच्या संकल्पनेला कुडाळ गावातील जेष्ठ व युवा वर्गाने नियोजन बद्ध काम करुन
मूर्त रुप दिले आहे. पिंपळबनची ही यशोगाथा भावी पिढ्यांना चिरकाल मार्गदर्शक ठरणारी असून ग्रामस्थांच्या या समाजउपयोगी धडपडीची दखल घेत खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी खासदार फंडातून केलेल्या सहकार्यामुळे पिंपळबनाच्या वैभवात आणखी भर पडणार असल्याची मते पिंपळबन समितीचे सदस्य व कुडाळ ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केली.

कुडाळ ता.जावळी येथील पिंपळबन उद्यानालगत सुरू असलेल्या संरक्षण भिंतीचे व सेल्फी पॉईंटच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज कुडाळ ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कुडाळ गावातील सर्व ग्रामस्थ, निसर्गप्रेमी व विविध पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, यात्रा कमिटी सदस्य, युवा वर्ग उपस्थित होते. यावेळी माहीती देताना पिंपळबनचे संकल्पक महेश पवार म्हणाले, पिंपळबन उद्यानाला येणाऱ्या काळामध्ये अधिक मदत व अधिक चांगलं मोहक रूप देण्याचा प्रयत्न सर्व ग्रामस्थांचा असून, मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे माध्यमातून श्री. पिंपळेश्वर मंदिर ते पवारआळी रस्त्यालगत ( पिंपळबनसाठी ) १० लाख रुपये फंड मंजूर करण्यात आला आहे, सदरची संरक्षक भिंत व जावली तालुक्यातील पहिला सेल्फी पॉईंट यानिमित्ताने पिंपलबनमध्ये साकारला जाणार आहे,

जावली तालुक्यातील सर्वात मोठा सामाजिक ,नैसर्गिक व लोकसभागातून सुरू असणाऱ्या कुडाळ येथील पिंपळबन उपक्रमासाठी आजपर्यंत अनेक दानशूर व्यक्तीनी आपापल्या परीने मदत केली आहे, नव्याने होत असलेल्या संरक्षण भिंत व सेल्फी पॉईंटच्या कामामुळे पिंपळबनच्या सुशोभीकरणासाठी अधिक बळ मिळाले आहे.

पिंपळबन व बालोद्यान – निसर्गप्रेमींचे नंदनवन

कुडाळच्या निसर्ग प्रेमी ग्रामस्थांनी संघटीत होऊन राबवलेला पिंपळबन व बालोद्यान हा स्तुत्य उपक्रम आहे. गावातील पडिक माळरान असणाऱ्या जागेत आज नंदनवन फुलवण्यसाठी ग्रामस्थांनी लोकसहभागातून सूरू केलेली सामाजिक चळवळ आजूबाजूच्या गावांसाठी प्रेरणादायी ठरत असून इतर गावांनी या उपक्रमाचे अनुकरण केले आहे, हा संपूर्ण प्रकल्प आज पर्यंत कोणत्याही शासकीय निधी शिवाय लोकसहभागातून उभारणे सुरू आहे. या माध्यमातून पिंपळ व वड यासह विविध प्रकारची सहाशे झाडे तसेच अन्य शोभिवंत झाडे लावुन ती ठिबक द्वारे जगवण्यात आली आहेत. या प्रकल्पात ज्येष्ठांना बसण्यासाठी बेंच, मुलांना खेळण्यासाठी खेळणी, व्यायामासाठी आोपन जिम, वाँकिंग ट्रँक अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. अल्पावधीतच हा उपक्रम लोकप्रिय झाला असून प्रत्येक जण या उपक्रमात सहभागी होऊन मदतीचा हात देत आहेत.

आपलं पिंपळबन व बालोद्यानाचा खालिल व्हिडीआो आवश्य पहा…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button