कुडाळ ता. 21 – जावळी तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी उत्तमराव पवार यांची तर उपाध्यक्षपदी शरद निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
नुकतीच झालेली जावळी तालुका खरेदी विक्री संघाची पंचवाषिर्क निवडणुक बिनविरोध करण्यात संचालक मंडळाला यश आल्याने या निवडणुकीत 17 संचालकांची निवड बिनविरोध करण्यात आली होती त्यामध्ये तालुक्यातील सर्व विभागातील सभासदांमध्ये समन्वय साधून संधी देण्यात आली होती आज कुडाळ येथील संस्थेच्या मुख्य कायार्लयात आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी निवडीवेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक एकच अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षपदी उत्तमराव पवार यांची तर उपाध्यक्षपदी शरद निकम यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी श्री. बी.जे. शेळके यांनी जाहीर केले.
निवडीनंतर प्रतापगड कारखान्याच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा शिंदे तसेच कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सैारभ शिंदे, जावळी खरेदी विक्री संघाचे मावळते अध्यक्ष नारायणराव पाटील यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बोलताना प्रतापगडचे अध्यक्ष सैारभ शिंदे म्हणाले, स्वर्गीय लालसिंगराव शिंदे व स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांच्या विचारांवर तसेच सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघाची निवडणूक बिनविरोध करून जिल्हयातील सहकारात चांगला आदर्श निर्माण केला आहे. संघावर आज एक रूपयाचेही कर्ज नसुन संस्था अत्यंत सुस्थिततित आहे, त्यामुळे संघाच्या माध्यानमातून चांगला कारभार करणे संचालक मंडळाला शक्य आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची जबाबादारी ही एक वर्षांसाठी दिली असून उतरही संचालकांना नक्की संधी मिळेल, प्रतापगड कारखान्याची निवडणुक झाली होती त्यामध्येही जावळीतील सुज्ञ सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवून पुन्हा एकदा आमच्याकडे कारखान्याची जबाबदारी सोपवली आहे, प्रतापगड काऱखाना, जावळी खरेदी विक्री संघ व कै. लालसिंगराव शिंदे सहकारी पतसंस्था या सर्व सहकारातील संस्था सुरळीत चालवणे व वाढवणे ही आमच्यासह सर्व संचालक सभासदांची जबाबदारी आहे, ती आम्हीआगामी काळात व्यवस्थितपणे पार पाडू असा विश्वासही यावेळी बोलताना व्यक्त केला.
नुतन अध्यक्ष उत्तमराव पवार म्हणाले, गेल्या पन्नास वर्षांपासून शिंदे कुटुंबासोबत ठेवलेली निष्ठा आज फळाला आली, संघाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखविला त्या विश्वासास पात्र राहून संस्थेच्या हितासाठी भविष्यात सार्वांना विश्वासात घेऊन पारदशर्क व विकासाभिमूक कारभार करून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकायार्मूळे संस्थेची निवडणुक बिनविरोध करण्यात यश आले. उपाध्यक्ष शरद निकम यांनी सर्वांचे आभार मानले. निवडीनंतर कायर्कत्यार्ंनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. यावेळी संघाच्या संचालिका श्रीमती सुनेत्रा शिंदे, सैारभ शिंदे, प्रतापगडचे उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अंकुशराव शिवणकर, दादा फरांदे, संचालक नारायणराव पाटील, दत्तात्रय घाडगे, अशोक महामुलकर, शिवाजी फरांदे,पांडुरंग तरडे, हरिभाउ शेलार, नंदकुमार धुमाळ, सैा. वैशाली कुंभार, सैा. संगिता गायकवाड, राजेंद्र भिलारे, संजय बोडरे,प्रकाश सुतार, लाला भिसे, व्यवस्थापक दिलिप पवार आदींसह आजी माजी संचालक,ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.