कुडाळ दिनांक – 19 (प्रतिनिधी) – आर्थिक कारणामुळे शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून महाराष्ट्र बँकेंने सुरु केलेल्या शैक्षणिक कर्जाचा (एज्युकेशन लोन) जावली तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. भारतात आणि विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बँकांनी गतवर्षी कोट्यावधी रूपयांचे कर्जाचे वाटप केले आहे. आगामी शैक्षणिक वर्षासाठीसु्ध्दा ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने शैक्षणिक कर्जाचे वाटप करण्यासाठी बँक आँफ महाराष्ट्र कटीबध्द असल्याचे मत कुडाळ ता.जावली येथील बँक आँफ महाराष्ट्रचे शाखा प्रमुख श्री.सरोजकुमार भगत यांनी बोलताना व्यक्त केले.
कुडाळ ता.जावली येथील बँक आँफ महाराष्ट्र शाखेत आज शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाचे वाटप करण्यात आले. यावेळी बिभवी येथील विद्यार्थी वरून महेश देशमुख याला युनिव्हर्सिटी कॉलेज बरमिंगहम (इंग्लड) या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी 20 लाख रूपयांचे शैक्षणिक कर्ज देण्यात आले तर, कुडाळ येथील विद्यार्थी
निमिष प्रमोद खटावकर याला युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रँथक्लाईड ( स्कॉटलंड ) या ठिकाणी जाण्यासाठी 30 लाख रूपयांचे
शैक्षणिक कर्ज बँक आँफ महाराष्ट्रच्या ( कृष्णानगर ) शाखेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी बोलताना पालक महेश देशमुख म्हणाले, व्यावसायिक शिक्षण महाग झाल्याने गुणवत्ता असलेल्या विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे अन्य शाखेत प्रवेश घेतात. वैद्यकीय, इंजिनिअरिंग, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवण्यासाठी पाच ते तीस लाख रुपयांचा खर्च येतो. खर्चामुळे शिक्षणावर पाणी सोडण्याची वेळ येऊ नये यासाठी शैक्षणिक कर्ज मिळणे हे अत्यंत फायदेशिर ठरते, कुडाळ शाखेतील सर्व अधिकारी यांच्या कार्यतत्परतेमुळे माझ्या मुलाला परदेशात शिक्षण घेण्यासाठी अत्यंत कमी कालावधीत शैक्षणिक कर्ज उपलब्ध झाले, कुडाळ शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी यासाठी योग्य मार्गदर्शन करून तात्काळ कर्ज उपलब्ध करून दिले, त्यामुळे माझ्या कुटुंबांचे मोठे स्वप्न पुर्णत्वास जाणार आहे, बँकेची अत्यंत चांगली सेवा असल्यामुळेच हे शक्य झाले, बँकेचा मी कायम आभारी व ऋणी राहीन असेही ते म्हणाले.
जावळी पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र परामणे बोलताना म्हणाले, कुडाळ परिसरात एकमेव बँक आँफ महाराष्ट्र ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक असल्याने अनेक कर्ज व व्यवहारांसाठी या बँकेचा येथील ग्राहकांना, खातेदारांना मोठा फायदा होतो, बँकेने ‘व्यावसायिक व परदेशी शिक्षण घेणाऱ्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध करुन देऊन ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे, जावळीतील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया येथे जात आहेत ही अभिमानाची गोष्ट असून अशा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बँकेने कर्ज उपलब्ध करुन दिल्याबद्दल बँकेचे आभार मानने गरजेचे आहे. काही वेळा बँकेबाबत विनाकारण नकारात्मक गोष्टी पसरवल्या जातात मात्र बँकेने केलेल्या चांगल्या कार्याचेही कैातुक होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले, बँक आँफ महाराष्ट्रचे शाखा प्रमुख श्री. सरोजकुमार बोलताना म्हणाले, कर्ज देताना आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाते, ज्या कर्जदाराने बँकेला अपेक्षित असणारी सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता वेळेत केल्यास त्याला विनाविलंब व तात्काळ कर्ज दिले जाते, यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक सरोजकुमार गणेश भगत, बँकेचे कर्मचारी मालुसू बालाजी, अस्मिता पवार, भुषण शिंदे, दिलिप गाढवे, किशोर गायकवाड, यांच्यासह बँकेचे ग्राहक महेश बारटक्के, बाळासाहेबबावकर व ग्रामस्थ उपस्थित होते,