कुडाळ दि.16- जावळी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचाराचे पडघम वाजत असून, अंतिम टप्प्यात प्रचाराला वेग आला आहे, सोमर्डी ग्रामपंचायत निवडनूकीत रुपाली नितीन कुंभार या लोकनियुक्त सरपंच पदासाठी जय भवानी माता सत्ताधारी पॅनेलच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
तरुणांचे आशास्थान आणि स्थानिक पातळीवर मोठ्या उमेदीने कार्यरत असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक संदीप परामणे यांनी बोलताना सांगितले की, सोमर्डी ग्रामपंचायत निवडणुकीत जय भवानी माता सत्ताधारी पॅनेलला मतदारांचा वाढता पाठींबा मिळत आहे. 7 सदस्य संख्या आणि 8 वा सरपंच अशी आकडेवारी असलेल्या सोमर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जय भवानी माता सत्ताधारी पॅनेल च्या वतीने रुपाली नितीन कुंभार थेट सरपंच…चिन्ह नारळ,परामणे सुमन अर्जुन.. कपाट,भिलारे लक्ष्मी बाजीराव.. सिलेंडर,परामणे मधुकर सोपान.. शिट्टी,महामुनी शकुताई महादेव… सिलेंडर,परामणे राहुल विलास…….. शिट्टी, परामणे रत्नप्रभा अरविंद….. कपाट,
सोनावणे अभिजित पोपट…. शिट्टी, यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या विकासाला चालना देण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आमदार फंडातून तसेच वसंतराव मानकुमरे यांच्या जिल्हा परिषद फ़ंडातून गेल्या पाच वर्षात वेळोवेळी विकास निधीही सुयोग्य प्रकारे मिळाला आहे.त्यामुळे सोमर्डी ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे,
या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व शक्तीनिशी जय भवानी माता सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन लहान, थोर मतदारांच्या भेटीगाठी घेणे अधिक पसंत केले असल्याचे चित्र सोमर्डी गावात दिसत आहे.
त्यामुळे पॅनेलच्या सर्व उमेदवारांना सोमर्डी गावातील मतदारांचा वाढता पाठिंबा असल्याचे पाहूनच विजयाची आता केवळ औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जात आहे, सोमर्डी येथील मतदार सुज्ञ असून या निवडनूकीत तरुणांची मोठी फळी निर्माण करणारे संदीप परामणे यांच्या पॅनेलचा या निवडणुकीत विजय नक्की समजला जात असून त्यांच्या पॅनेलचे पारडे जड असल्याचे संकेत मिळत आहेत.