कुडाळ दिनांक -13 (प्रतनिधी)
सातारा आणि जावली मतदारसंघातील ५३ गावातील विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून ३ कोटी ८१ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला असून त्यामुळे ५३ गावातील विकासकामे मार्गी लागणार आहेत.
सातारा तालुक्यातील २६ गावांसाठी १ कोटी ७९ लाख निधी मिळाला असून यामध्ये रेवंडे येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता दुरुस्त करणे, गजवडी येथे स्मशानभूमी शेड बांधणे, गोळेवाडी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, शेळकेवाडी येथे ग्रामसचिवालय बांधणे, कारी येथे ग्रामसचिवालय बांधणे,कळंबे येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे, आकले स्मशानभूमीची सुशोभीकरण करणे, बेबलेवाडी स्मशानभूमीची सुशोभीकरण करणे, पिंपळवाडी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे, रायघर येथे स्मशानभूमी शेड बांधणे, कामथी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, सारखळ येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, आवाडवाडी (आंबेदरे) येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, अनावळे येथे स्मशानभूमी शेड बांधणे, घाटाई फाटा ते जांभळेघर कडे जाणारा रस्ता करणे, मापारवाडी येथे स्मशानभूमी शेड बांधणे, बोरगांव येथील ग्रामपंचायत कार्यालय विस्तारित करणे, यवतेश्वर येथे रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, महागाव येथे अंतर्गत रस्ते व बंदिस्त गटर करणे, इंगळेवाडी अंतर्गत बेबलेवाडी ते नुने शाळा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, खड्गाव येथील स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, लिंब येथील शेरी उद्यान विकसित करणे, शेरी उद्यानाचे सुशोभीकरण करणे, लिंब येथे अशोक सावंत घर ते लिंब रस्ता खडीकरण करणे, घाटवण येथे घाटाई मंदिर परिसरात संरक्षक भिंत बांधणे या कामांचा समावेश आहे.
जावली तालुक्यातील २७ गावांसाठी २ कोटी २ लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून त्यातून मेढा तर्फ करंजे गणपती मंदिराशेजारी संरक्षक भिंत बांधणे, मामुर्डी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे तसेच स्मशानभूमी निवारा शेड आणि सुशोभीकरण करणे, सरताळे येथे अंबाबाई मंदिर ते काळेवाडी हनुमान मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, सर्जापूर येथील मागासवर्गीय वस्ती ते सटवाई ओढा आर.सी.सी. गटर बांधणे, भिवडी मारुती मंदिर ते जिल्हा परिषद शाळा रस्ता डांबरीकरण, बेलवडे येथे गाव ते शंकर मंदिर रस्ता डांबरीकरण करणे, कुरुळतिजाई अंतरंगात रस्ता काँक्रीटीकरण करणे, महिगाव येथे स्मशानभूमीमध्ये शवदाहिनी बसवणे, आसणी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, आनेवाडी व महामूलकरवाडी व इतर दोन गावे येथे ४ बेडचे स्मशानभूमी शेड बांधणे, कोलेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, भोगवली मुरा येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, म्हाते खुर्द ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे, म्हाते मुरा येथे गाव ते स्मशानभूमी जाणारा रस्ता करणे, बामणोली ते कुडाळ येथे स्मशानभूमी शेड व सुशोभीकरण, सांगवी येथे ग्रामपन्चायत कार्यालय बांधणे, दरे बु. स्मशानभूमी सुशोभीकरण, आखेगनी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, बिभवी ग्रा.मा. १४२ बिभवी स्मशानभूमी ते रा.मा. १४० ते बिभवी जाणारा रस्ता करणे, गांजे स्मशानभूमीची सुधारणा करणे, कुडाळ स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे, कुडाळ येथील श्री स्वामी समर्थ कॉलनी येथे रस्ता डांबरीकरण व गटार बांधणे, कुडाळ येथील पिंपळेश्वर कॉलनी क्र. ३ रस्ता व गटर बांधणे, नरफदेव मेरुलिंग संरक्षक कठडे बांधणे, मेरुलिंग परिसरात सोयी सुविधा करणे, करहर मंदिर परिसरात सोयी सुविधा करणे आदी कामे मार्गी लागणार आहेत.