सचिन वारागडे/ प्रतिनिधी
कुडाळ दिनांक 21 – प्रतिनिधी – जावळी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कुडाळ येथे व्यापारी व भाजीपाला व्यवसायिकांसह अनेकांचे व्यवसाय अंदाजे ३० वर्षापासुन कुडाळ बाजारपेठेत सुरू आहेत. यातूनच या दुकानदारांचा घराचा उदरनिर्वाह होत आहे. परंतु गेल्या आठ दिवसांपुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने कुडाळ पाचगणी या कुडाळ अंतर्गत रस्तायवरील बाजारपेठेत रस्त्याच्या मध्यापासून 5.50 मीटर अंतरावर सरकारी हद्दीत पत्र्याचे अतिक्रमण केले असल्याबाबतच्या नोटीसा संबंधित गाळाधारक व व्यापार्यांना पाठवल्या होत्या, तसेच सदरचे अतिक्रमण सांगितलेल्या वेळेत न हटविल्यास ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटविण्यात येईल व त्यास येणारा खर्चही वसुल केला जाईल असा इशारा नोटीसेद्वारा देण्यात आला होता, त्यामुळे बांधकाम विभागाच्या या धोरणाविरोधात संतप्त झालेल्या व्यापारी व भाजीपाला व्यवसायिकांनी एकत्रित येवून कुडाळ ग्रामपंचायती समोर ठिय्या आंदोलन करीत एक दिवसाचा कडकडीत बंद पुकारला.या बंदला कुडाळकरांनी शंभर टक्के प्रतिसाद देत बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली.
याबाबत अधिक माहीती अशी की, कुडाळ हे परिसरातील 20 कीमी अंतरातील सर्वांत मोठी बाजारपेठ असून येथे शेकडो व्यवसायिक वेगवेगळे व्यवसाय करित आहेत, काहींचे स्वताच्या मालकीची दुकाने आहेत तर काहींची भाडेतत्वावरील गाळे, दुकाने आहेत. मागील आठ दिवसांपुर्वी येथील काही दुकानदारांना आपली अतिक्रमित दुकाने हटविण्यासाठीची नोटीस सार्वजनिक बांधकाम उपविभाग जावली यांच्याकडुन आल्याने दुकानदार फार धास्तावले असुन ही दुकाने हटविल्यास दुकानदारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी या दुकानदारांचे अतिक्रमण हटविण्या अगोदर त्यांच्या उदरनि्र्वाहाची पर्यायी व्यवस्था करुन त्यांना न्याय द्यावा, यासाठी कुडाळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर दि.21 रोजी साखळी उपोषण सुरू केले असूनजो पर्यंत अन्यायकारक अतिक्रमण मोहीम रद्द होणार नाही, तो पर्यंत गाळेधारक व व्यापाऱ्यांचा लढा सुरूच राहील असा आक्रमक पवित्रा व्यापारी व भाजीपाला व्यवसायिकांनी घेतला आहे.
यावेळी कोणा एकट्या व्यक्तीच्या तक्रारीमुळे हा निर्णय घेवून आमच्या गरिबांच्या जगण्याचा मार्ग कशासाठी उद्धवस्त करायचा, पुर्ण हयात येथे व्यवसाय करण्यात घालवली आहे, मात्र अतिक्रमणाच्या नावाखाली आमच कुटूंब अंधारात का ढकलून देत आहात, आमच्यावर उपासमारीची वेळ आणून अतिक्रमणाच्या कारणाने आमच्या जीवावर का घाव घालत आहात.. आम्हाला आगोदर रोजगार, किंवा नोकरी मिळवून द्या आणि खुषाल आमच्या व्यवसायावर बुलडोजर फिरवा असा संतप्त प्रतिक्रियाही काही व्यवसायिकांनी दील्या.