कुडाळ दिनांक -15 (प्रतिनिधी) :
पिंपरी चिंचवड येथे मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन १९ आणि २० नोव्हेंबर रोजी होत आहे. या अधिवेशनासाठी सातारा जिल्ह्यातून ३५० हून अधिक पत्रकार उपस्थित असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष शरद काटकर ,जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर परिषदेच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकी वेळी ते बोलत होते. यावेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष दीपक प्रभावळकर,प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे,पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे सदस्य सुजित आंबेकर आणि डिजिटल मीडियाचे अध्यक्ष संतोष शिंदे आणि पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.
उपाध्यक्ष काटकर म्हणाले, राष्ट्रीय अधिवेशनासाठी सर्व तालुक्यातील पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या अधिवेशनात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार असल्याने सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे. जिल्हाध्यक्ष हरीष पाटणे म्हणाले, मराठी पत्रकार परिषदेचे मार्गदर्शक एस. एम. देशमुख यांनी पत्रकारांना ताकद दिली आहे. पत्रकारांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याचे आणि त्यांना अडचणीत मदत करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाण्याचा पत्रकार संघटनेचा प्रयत्न असतो. त्यामुळे सातारा जिल्ह्याची मराठी पत्रकार परिषदेमागे असणारी ताकद या अधिवेशनाच्या माध्यमातून दाखवून देण्यात येणार आहे.
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दीपक शिंदे म्हणाले, या अधिवेशनामध्ये पत्रकारांच्या प्रश्नांसोबतच पत्रकारितेतील नवीन बदल, संसाधने, समाज माध्यमे यांसह विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. पत्रकारितेतील नवीन माध्यमे आणि आव्हाने त्याबरोबरच नवीन पिढी येताना त्यांच्यासमोरची आव्हाने या सर्वांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे नव्याने पत्रकारितेत येणाऱ्यांसाठीही हे अधिवेशन मार्गदर्शक ठरणार आहे. या बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य चंद्रसेन जाधव डिजिटल मीडियाचे जिल्हा खजिनदार प्रशांत जगताप,सदस्य संदीप शिंदे,विश्वास पवार,विनीत जवळकर,विठ्ठल हेंद्रे,डिजिटल मीडियाचे शहराध्यक्ष प्रतीक भद्रे,उपाध्यक्ष साई सावंत,सचिव गुरुनाथ जाधव,खजिनदार अमोल निकम,महेश पवार,प्रमोद इंगळे,रिजवन सय्यद,महेश क्षीरसागर, सचिन सापते,शुभम गुजर,तसेच साताऱ्यातील अनेक पत्रकार बांधव प्रमुख उपस्थित होते
मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाची जोरदार तयारी – मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांनी घेतला नियोजनाचा आढावा
मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.आज पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेतील पत्रकार कक्षात जावून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख , मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषदेचे संघटक सुनील वाळुंज व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला. पुणे विभागीय सचिव अरुणनाना कांबळे ,मराठी पत्रकार परिषदेचे निवडणूक विभाग प्रमुख बाळासाहेब ढसाळ, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, उपाध्यक्ष प्रवीण शिर्के जिल्हा प्रतिनिधी अनिल भालेराव, समन्वयक अविनाश आदक व पिंपरी चिंचवड विश्वस्त किरण नाईक व राज्य जनसंपर्कप्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आकर्षण केंद्र म्हणून तीन कार्यक्रमाचा उल्लेख होत असून. यामध्ये आम्ही अँकर हे चर्चसञ त्याच बरोबर डिजिटल मीडिया प्रिंट मीडियाला धोका ठरतोय का हा परीसंवाद व खा. अमोलजी कोल्हे यांची प्रगट मुलाखत या तीन कार्यक्रम हे येणाऱ्या पत्रकार बांधवां साठी महत्त्वाचे व आकर्षक ठरणारा असून या अधिवेशनातील कार्यक्रमाचा लाभ सर्व उपस्थित पत्रकारांनी घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे जनसंपर्कप्रमुख अनिल महाजन यांनी केले
मराठी पञकार परीषदेच्या 43 व्या पिंपरी चिंचवड येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय आधिवेशनत विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सध्या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू असून चर्चा सञ व परिसंवाद हे महत्वाचे ठरणार असून
आम्ही अँकर हे चर्चासत्र आकर्षक ठरणार असून यामध्ये रोज आपल्या समोर टीव्ही चॅनलवर दिसणारी अँकर मंडळी ही रोज त्यांच्या समोर असणाऱ्या समस्या व त्यांचे प्रश्नही मांडणार आहेत त्यांचे अनूभव कथन करणार आहे. या चर्चासत्रात न्यूज 18 लोकमतचे मिलिंद भागवत, विलास बडे, एबीपी माझाचे अश्विन बापट, झी 24 तास च्या अनुपमा खानविलकर, रेश्मा साळुंखे, टि व्ही 9 च्या निकिता पाटील यांचा सहभाग असणार आहे या बरोबरच दि डिजिटल मीडिया प्रिंट मीडियाला धोका ठरतोय का या महत्त्वपूर्ण विषयावर व सध्या पत्रकार चर्चेच्या असणाऱ्या विषयावर परिसंवाद होणारा असून या चर्चासत्रास अध्यक्षस्थानी जेष्ठ माध्यमकर्मी समिरण वाळवेकर, हे तर या चर्चासञात सकाळचे समूह संपादक सम्राट फडणीस, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक पराग करंदीकर, मॕक्स महाराष्ट्राचे संपादक रवी अंबेकर, जेष्ठ संपादक तुळशीदास भोईटे यासह परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख परिषदेचे विश्वस्त किरण नाईक परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे आदींची उपस्थिती या चर्चासत्रात लागणार आहे हे दोन्हीही चर्चासत्र या अधिवेशनाचे केंद्रबिंदू ठरणारा असून आकर्षणही येणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचे ठरणार आहे त्याचप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीतील शिवछत्रपती म्हणून ओळखले जाणारे चित्रपट अभिनेते खा. अमोल कोल्हे यांची प्रगट मुलाखत हेही आकर्षण ठरणारा असून त्यांची मुलाखत मिलिंद भागवत व विलास बडे ही ज्येष्ठ अँकर मंडळी घेणार आहे. हे अधिवेशन यशस्वी करण्या साठी पिंपरी चिंचवड पञकार संघाचे पदाधीकारी परीश्रम घेत आहेत. यामुळे या अधिवेशनात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचा लाभ येणाऱ्या पत्रकारांनी उपस्थिती लावून घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे.