
कुडाळ दिनांक – 16 (प्रतिनिधी) – जावळी तालुक्यात 673 हून अधिक प्राथमिक शिक्षक सभासद असून, यातील बहुतांश शिक्षकांनी एकत्रित येत सिध्देश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली स्व. मा आ. शिवाजीराव पाटील प्रणित सभासद विकास पॅनेलचे जावली गटातील सर्वसाधारण पुरूष गटातील उमेदवार विजय धर्माजी शिर्के यांना विजयी करण्याचा विडा उचलला आहे. शिक्षकांनी एकत्र येत सभासद विकास पॅनेलला मताधिक्याने विजयी करण्याची शपथच घेतली आहे. या मतदारसंघात सभासदांनीच निवडणूक हातात घेतल्याने स्व. मा आ. शिवाजीराव पाटील प्रणित सभासद विकास पॅनेलला हा मोठा आधार निर्माण झाला आहे. सभासद विकास पॅनेलचे उमेदवार विजय धर्माजी शिर्के यांच्या प्रचारार्थ कुडाळ ता.जावली येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. या निवडणुकीत जावलीचा स्वाभिमान राखत शिक्षक बँकेत विजय धर्माजी शिर्के यांना मोठ्या मताधिक्य देत पाठवण्याचा निर्धार केला. यावेळी मच्छिंद्र मुळीक, मिलन मुळे, रघुनाथ दळवी, सुरेश जेधे, अशोक लकडे, यांच्यासह पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभासद विकास पॅनेलच्या विजयात सहभागी व्हा…..
सातारा जिल्हा शिक्षक संघ, खाजगी शिक्षक महासंघ, जुनी पेन्शन संघटना, यांसह अनेक शिक्षक संघटनापुरूस्कृत सभासद विकास पॅनेलची प्राथमिक शिक्षक बँकेवर सत्ता येणार हे आता निश्चित झाले आहे.सभासद विकास पॅनेलने स्वच्छ आणि पारदर्शी चेहऱ्यांना संधी दिली आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असे मिलन मुळे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना उमेदवार विजय शिर्के म्हणाले, सर्व मतदार बंधू-भगिनींना मी आवाहन करतो की,
मी. श्री. विजय धर्माजी शिर्के स्व. आ. शिवाजीराव पाटील आण्णा प्रणित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुरस्कृत सभासद विकास पॅनलकडून जावली मतदारसंघातून संचालक पदासाठी निवडणूक लढवत आहे. तरी आपले आशीर्वादरुपी अनमोल मत मला व पॅनलच्या सर्व उमेदवारांना देऊन सभासद विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी. भविष्यात संचालक म्हणून मी शिक्षकांचे प्रश्न ,अडीअडीचणी सोडवण्यासाठी कटीबध्द राहीन, तसेच आत्तापर्यत मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा सभासद म्हणून कार्यरत असून जावली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा सभासद वसरचिटणीसही आहे, तसेच तालुका स्तरावर संघटनेच्या सर्व कामात माझा सक्रिय सहभाग असून शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक अडचणी सोडवण्यात अग्रेसर आहे. तसेच तंत्रस्नेही शिक्षक व शिष्यवृत्ती मार्गदर्शक व यशस्वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवणारे शिक्षक म्हणूनही मी परिचित आहे.

