कुडाळ दिनांक – 8 : जावळी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी जेवढ्या जागा तेवढेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून फक्त निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी राहिली आहे. त्यामुळे स्वर्गीय लालसिंगराव शिंदे व स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांच्या विचारांवर तसेच सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेतृत्व प्रतापगडचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांच्या नेतृत्वावर संघाच्या सभासदांनी शिक्कामोर्तब केले आहे असेच म्हणावे लागेल.
माजी आमदार दिवंगत लालसिंगराव शिंदे व स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांनी या संस्थेची स्थापना करून आजपर्यंत कारखाना गटाच्या ताब्यात ही संस्था ठेवली आहे. त्यानंतर संस्थेच्या अनेक निवडणुका बिनविरोध पार पडल्या. दिवंगत लालसिंगराव शिंदे व स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांच्या निधनानंतर खरेदी विक्री संघाची धुरा श्रीमती सुनेत्रा शिंदे यांनीही यशस्वीपणे सांभाळली आता तालुक्याचे युवा नेतृत्व व प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभ बाबा शिंदे यांनीही तीच परंपरा अंखडीत ठेवून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध करून सहकारात चांगला आदर्श निर्माण केला आहे. नुकतीच प्रतापगड कारखान्याची निवडणुक झाली होती त्यामध्ये तालुक्यातील काही विरोधकांनी आव्हाण निर्माण केले होते , त्यामुळे या संघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवार दि. 4 नोव्हेंबर होती, अर्जांची छाननी झाली. त्यामध्ये सर्व अर्ज पात्र झाल्याने बिनविरोध निवडणूकचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक काम पहात आहेत.
दिवंगत लालसिंगराव शिंदे व स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांचे राजकीय वारसदार म्हणून प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभ बाबा शिंदे काम पाहात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली यावेळी पहिल्यांदाच खरेदी विक्री संघाची निवडणूक लढवली जात असून या निवडणुकीचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाल्याने अध्यक्ष सैारभ बाबा शिंदे यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास दाखवल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
यानिमित्ताने सर्व नवनिर्वाचित संचालकांचा कुडाळ येथे नुकताच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी सातारा जावळी चे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सर्न संचालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगडचे उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, कुडाळ सोसायटीचे अध्यक्ष मालोजीराव शिंदे, दादा पाटील, बबनराव चव्हाण, अंकुशराव शिवणकर, जयदीप शिंदे, यांच्या,सह तालुक्यातील विविध मान्यवर, पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.