कुडाळ दिनांक 8 – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट ), अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ (दोंदे प्रणित) यांच्या संयुक्त सभासद परिवर्तन पॅनल यांच्या जावली तालुक्यातील उमेदवारास विजयी करण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्यध्यक्ष श्री उदय शिंदे यांनी शनिवार दिनांक 5/10/2022 रोजी इंदवली येथील बैठकीमध्ये व्यक्त केला.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या नियोजना संदर्भाने घेण्यात आलेल्या जावली तालुक्याच्या सहविचार सभेला सर्व इच्छुक उमेदवार श्री सुरेश पार्टे, श्री विनायक चोरट, श्री नितीन मोहिते, श्री तानाजी आगुंडे, श्री विजय बांदल व ज्यांची एकमताने निवड झाली ते शिक्षक समितीचे जावली तालुक्याचे उमेदवार श्री शामराव जुनघरे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष श्री उदय शिंदे, तालुका अध्यक्ष श्री सुरेश चिकने, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री धीरेश गोळे, शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री गजानन वारागडे, श्री मदन बोराटे, श्री महादेव निकम, श्री सत्यवान निकम ,विजय जुनघरे , संपत शेलार श्री.रणजीत शिंदे ,ज्ञानेश्वर शिर्के, महिला आघाडी प्रमुख सौ.मनिषा शेलार (वाडकर), सौ स्वाती बारटक्के (चिटणीस) तसेच शिक्षक समितीवर प्रेम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या उपस्थितीत आणि राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुक्याचे उमेदवार शामराव जुनघरे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.