

कुडाळ दि. 21 – जावलीचे सुपुत्र शहीद तुकाराम ओंबळे यांनी 26 / 11 च्या दहशवादी हल्यात कसाब सारख्या खतरनाक दहशतवाद्याला पकडून खऱ्या अर्थाने पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे काम केले होते, खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मारकाला एवढा विलंब झाला ही शोकांतिका आहे परंतु आता शहिद तुकाराम ओंबळे साहेबांचे स्मारक हे येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी व स्फूर्तीदायक व भव्य स्वरूपात झाले पाहिजेत त्यासाठी शासनाकडून 10 कोटीपेक्षाही अधिकचा निधी लागला तरी तो दिला जाईल परंतू त्य़ांचे स्मारक भव्यदिव्य स्वरूपात झाले पाहीजेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्या असल्याची माहीती शिवसेना सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी दीली.

मुंबई येथे वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व पालकमंत्री शंभूराज देसाई यांची एकनाथ आोंबळे यांनी भेट घेऊन जावलीचे सुपुत्र शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी व बोंडारवाडी धरण आदींसाठी निधीची मागणी केली या भेटी दरम्यान सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सुध्दा त्याठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते, पुढे ते म्हणाले, जावलीतील बोंडारवाडी धरण व सोळशी येथील देवसरे धरण हे दोन्ही प्रकल्प ताबडतोब मार्गी लावायचे आहेत तसेच दरम्यान मुख्यमंत्री साहेबांनी स्मारकाला किती निधी लागेल याची विचारणा केली असता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कमीत कमी दहा कोटी रुपये लागतील असे सांगितले, त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी दहा कोटीच नाही त्यापेक्षा अधिकचा निधी लागला तरी तो दिला जाईल तुम्हाला परंतु ओंबळे साहेबांचे स्मारक हे भव्य आणि दिव्य झालं पाहिजे अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आदेशामुळे समस्त जावलीकरांच्या आशा पलल्वीत झाल्या असून, मुख्यमंत्री शिंदे व पालकमंत्री देसाई यांचे आभार एकनाथ ओंबळे यांनी मानले.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग हादरले. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला अतर 300 हून अधिक जण जखमी झाले. 26 नोव्हेंबरला मुंबई हल्ल्याला 14 वर्षे पूर्ण झाली, पण मुंबई हल्ल्याच्या जखमा अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत. अजमल कसाब हा एकमेव पाकिस्तानी दहशतवादी होता जो मुंबई हल्ल्यात जिवंत पकडला गेला होता. कसाबला पकडण्याचे शहिद तुकाराम ओंबळे यांना जाते, कारण तुकाराम आोंबळे यांनी कसाबच्या AK-47 रायफलची बॅरल हिसकावून घेतली. तो गोळीबार करत राहिला, पण त्यांनी त्याला सोडले नाही. तुकाराम ओंबळे यांनी काठीने AK-47 चा सामना केला आणि दहशतवादी कसाबला जिवंत पकडले होते.


