पोलीस ठाण्याच्या सी सी टिव्हीतून वस्तुस्थिती स्पष्ट होणारच असल्याचा दावा
कुडाळ दि. 9 – केवळ आरोपांची राळ उडवून मला अडचणीत आणण्याचे काम काही लोक जाणून-बुजून करत आहेत, माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये व दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्हयांमध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. काही लोक आगामी निवडणुकीच्या तोंडावर विनाकारण बदनामी करून आपली पोळी भाजून घेत आहेत हे वास्तव आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे मला केवळ राजकीय हेतूने बदनाम करण्याचा प्रकार आहे. माझ्यावरील आरोपांमागे राजकीय सुडाचा वास आहे
मला चुकीच्या पध्दतीने प्रेझेंट करून मला वारकरी असतानाही बदनाम करण्यात आले आहे, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र सत्याची बाजू लवकरच सर्वानसमोर येईलच पोलिस स्टेशनच्या सीसी टीव्ही कँमेरात झालेला सर्व प्रकार कैद झाला आहे, मात्र मी एक वारकरी सांप्रदायातील व्यक्ती असून मी अऩ्याय सहन करणारा नाही व अन्याय करणाऱ्याला माफही करणार नाही ही माझी ठाण भुमिका आहे, असे परखड मत प्रविण महाराज शेलार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मेढा पोलीस ठाण्यात युवकांच्या मारामारी नंतर काल गुन्हा दाखल करण्यावरुन राडा झाला. यावेळी दोन गट एकमेकांमध्ये भिडले. त्यामुळे मेढा पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण होते. या घटनेनंतर पोलीसांनी एका गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता त्याप्रकरणी प्रविण महाराज शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधून त्यांची बाजू मांडली त्यावेळी ते बोलत होते, यावेळी ते पुढे म्हणाले, विरोधकांनी माझे चुकीच्या पध्दतीने व्हिडीआो व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र माझ्यावर आरोप केले ते चुकीचे आहेत. जे गुन्हे दाखल केले आहेत त्याची चौकशी अद्याप झालेली नाही, त्यामुळे एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे कितपत योग्य आहे, चौकशीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल सादर होणारच आहे. त्यातून वस्तूस्तिथी समोर येणारच आहे. परंतु त्यापूर्वीच माझे व्हिडीआो व्हायरल करून मला बदनाम करण्याच प्रयत्न सूरू आहे, यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही परिस्तितीला सामोरे जाण्यास तयार आहे, माझ्यावरील दाखल करण्यात आलेल्या गुन्हामागे राजकीयषड्यंत्र आहे, दिनांक 4 रोजी माझ्या एका निकटवर्तीयांच्या अल्पवयीन मुलाला दारूच्या नशेत मारहाण करण्यात आली त्याला मारणारा हा दारूच्या नशेत होता म्हणून मी पोलिस ठाण्यात जाब विचारण्यासाठी गेलो असता संबंधित मारहाण करणारा व्यक्तीही पोलिस ठाण्यात हजर होता, त्यावेळी त्याने दारू पिलेली होती त्याचा वासही येत होता त्यामुळे पेलिस कर्मचाऱ्यांना मी संबंधिताची मेडीकल टेस्ट करा अशी विनंती केली मात्र संबंधिताने दारू पिलेली नाही असे एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले व त्याची बाजू घेऊन त्याला मदत कऱण्याचा प्रयत्न केला, त्याला पोलिस ठाण्याच्या आवारातच मिठी मारली, हातात हात मिळवून हितगुज केली, म्हणून अशा चुकीच्या वागण्यामुळे मी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला जाब विचारला मात्र माझ्या बाबतचा त्याचा व्हिडीआो व्हायरल करण्यात आला, मात्र त्याच्या आधीचा व नंतरचा व्हिडीआो जाणिवपुर्वक दाखवण्यात आला नाही, मला चुकीच्या पध्दतीने प्रेझेंट करून मला वारकरी असतानाही बदनाम करण्यात आले, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
मात्र सत्याची बाजू लवकरच सर्वान समोर येईलच पोलिस स्टेशनच्या सीसी टीव्ही कँमेरात झालेला सर्व प्रकार कैद झाला आहे त्याची सखेल चैाकशी करण्यात यावी, व मला न्याय मिळावा म्हऩून मी वेळ पडली तर न्यायालयीन लढाही देणार आहे, महाराष्ट्रातील वारकरी संघटना माझ्या पाठिशी आहे, मी काहीही चुकीचे केलेले नाही त्यामूळे वेळप्रसंगी मी संघटनेच्या माध्यमातून या प्रकऱणावर आवाज उठवणार आहे, पोलिस ठाण्यात आमच्या सारख्यांवर अशी वेळ येत असेल तर सर्वसामान्य जनतेला कशी वागणुक मिळत असेल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे, मी केवळ जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या सोबत असतो, त्यांचा सहकारी आहे म्हणून माझ्यावर राजकीय सुडातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र मी अऩ्याय सहन करणारा नाही व अन्याय करणाऱ्याला माफही करणार नाही ही माझी ठाम भुमिका आहे, माझ्यावर मारहाणीचा खोटा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे, तो संपुर्णपणे चुकीचा आहे जावळी तालुक्यात जी अराजकता सुरू आहे ती थांबली पाहीजेत. असेही त्यांनी नमूद केले.