कुडाळ दि. 6 – मेढा ता. जावली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क अभियान अतंर्गत घेण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या जावली तालुका पदाधिका-यांच्या नियुक्ती करण्यात आल्या, यावेळी आमदार शशिकांत शिंदे व माथाडी कामगार ऋषीभाई शिंदे यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून आोळखले जाणारे कुडाळ येथील समीर यासिन डांगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या जावली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मेढा ता. जावली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क अभियान अतंर्गत पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष श्री.सुनील माने, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. दिपक पवार, श्री. सारंग पाटील, श्री.राजकुमार पाटील, युवा अध्यक्ष श्री.तेजस शिंदे, श्री.राजेंद्र लवंगरे, श्री.रघुवीर पवार, श्री.शाफिक शेख, श्री. रमेश उबाळे, श्री.शशिकांत वायकर, श्री.भानुदास भोसले, सौ.रुपाली भिसे, श्री.अतिष कदम, यांच्यासह सर्व फ्रंट सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या जावली तालुका अध्यक्षपदी समीर डांगे यांची तर सातारा जिल्हा सरचिटणीसपदी कदिर मणेर यांची ताज शेख यांची कुडाळ अल्पसंख्याक युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.सदर निवडी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष श्री.सुनील माने, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांना नवनिर्वाचित पदांचे प्रमाणपत्र देऊन मान्यवरांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
पक्षाच्या ध्येयधोरणे, शरद पवार साहेबांचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी आपण फक्त पद न घेता गावा गावात व गल्लीगल्लीत सामान्य नागरिकांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे काम येणारा काळात जिल्ह्यात शंभर टक्के काम पूर्ण झाले पाहिजे असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या, नुतन तालुकाध्यक्ष समीर डांगे यांनी अल्पसंख्यांक सोबत सर्व समाजांच्या कामांचे कार्य करण्याची हमी दिली, जनतेच्या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव काम करीत राहील, पक्षसंघटन वाढीसाठी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे अभिवचनही दिले. समिर डांगे यांच्या निवडीबद्दल कुडाळ बहुजन विकास आघाडीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.