महेश बारटक्के –
कुडाळ दि. 2 – मा. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दी वर्ष व
महात्मा गांधी ,लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री बैठक सदस्य कुडाळ पंचक्रोशी व ग्रामस्थ कुडाळ ,पिंपळबन सदस्य कुडाळ यांचे वतीने कुडाळ अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
समाज परिवर्तनासाठी आपल्या अमूल्य समर्थ विचारांनी उत्तम दिशा देण्याचे महान कार्य गेली अनेक दशके धर्माधिकारी कुटुंबाकडून अविरतपणे सुरु आहे. स्वच्छतेचे महत्व या बाबीची जाणीव प्रत्येक व्यक्तीला व्हावी व प्रत्येकाच्या हृदयात उतरावी म्हणून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे संपुर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेत गावोगावी स्वच्छता करण्यात येत आहे.
जेष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त देशाचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याचाच भाग म्हणून जावळी तालुक्यातील कुडाऴ गावतही ता.2 आँक्टोबर रोजी सकाळपासून श्री सदस्य हातामध्ये झाडू, पंजे, फावडे, ट्रॅक्टरसह गावांतील सर्व रस्त्यांवर स्वछता करण्यात आली. कुडाळमध्ये कुडाळ बाजारपेठ, नटराज चैाक, गजराज चौक, मारुती मंदिर, संत सावता माळी चौक, फुलस्ती मंदिर, पिंपळबन उद्यान, पिंपळेश्वर मंदिर , वारागडेआळी या ठिकाणी उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व प्रकारच्या कचऱ्याचे निर्मूलन करण्यात आले.
सर्व सदस्य श्री बैठक यांच्याकडून संपूर्ण कुडाळ गाव एक वर्षासाठी स्वच्छता करणे संदर्भात दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून महिन्याच्या शेवटच्या रविवारी गावातील विविध रस्त्यावर स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे .
त्यांचे हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे आणि सर्व ग्रामस्थ कुडाळ यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये सहकार्य करण्याची भावना व्यक्त यावेळी केली. यावेळी गावातील सर्व घटकांतील नागरिकांनी, युवक, महिला, जेष्ठ नागरिक आदींनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.