कुडाळ ता. 28 – सर्वसामान्यांची अर्थवाहीणी अशी ओळख असलेल्या श्री पिंपळेश्वर ग्रामीण बिगर शेतीसहकारी पतसंस्था मर्यादित कुडाळ या पतसंस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात गुरूवार (दि.29) सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे सचिव अजित शिराळकर यांनी दिली आहे.
पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन सुरेशराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, ग्रामस्थ, तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने पतसंस्थेच्या सहकारी वर्षाचा अहवाल, ताळेबंद सादर करण्यात येणार आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने श्री विरेंद्र शिंदे यांनी केले आहे.
या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने पतसंस्थेच्या सहकारी वर्षाचा अहवाल, ताळेबंद सादर करण्यात येणार आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने श्री विरेंद्र शिंदे यांनी केले आहे.