कुडाळ ता. 27 (प्रतिनिधी) – बोंडारवाडी धरण कृती समितीचे प्रनेते, जलनायक, जावली तालुक्याच्या विकासाचे स्वप्न पहाणारे व दाखणारे स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेब यांचे आकस्मिक निधन झाले होते,
त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी तमाम जावळीकर यांच्या वतीने बुधवार दिनांक २८/०९/२o२२
रोजी दुपारी ठिक १ वाजता स्वामी समर्थ मंगल कार्यालय नांदगणे (केळघर) येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मा. श्री. डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष श्रमीक मुक्ती दल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.
विजयराव मोकाशी यांच्या आकस्मित निधनामुळे बोंडारवाडी धरण कृती समितीच्या माध्यमातून गेल्या १३ वर्षांपासून जावळी तालुक्यातील ५४ गावांसाठी लढणारे या चळवळीचे अर्धव्यु हरपले अशी भावना जावळी तालुक्यातील ५४ गावांतील ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत होती. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागावा अशी मोकाशी साहेब यांची इच्छा होती.
प्रतिकुल परिस्थितीत विजयराव मोकाशी यांचे नेतृत्व घडले होते. वरोशी सारख्या छोट्याशा गावातून आयडीबीआय बँकेच्या उपमहाव्यवस्थापक पदापर्यंत मोकाशी यांचा प्रवास थक्क करणारा व स्वप्नवत आहे. सामान्य कुटुंबातील विजय मोकाशी यांनी आपल्या प्रेमळ व विनम्र स्वभावाने व आपल्या सामाजिक कार्याने जावळी तालुक्यातील जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे
त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व बोंडारवाडी धरणकृती समितीचे सभासद, शेतकरी, महिला, युवकांनी व तमाम जावलीकरांनी या शोकसभेत बहुसंखेने उपस्थीत रहावे असे आवाहन
स्थळ बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.